Goa crime involving children Dainik Gomantak
गोवा

चिंताजनक! गोव्यात गुन्‍हेगारीच्‍या घटनांत 460 मुलांचा सहभाग; ‘चिल्‍ड्रन इन इंडिया’ने जाहीर केली टक्केवारी; वाचा Report

Children crime statistics Goa: राज्‍यात २०२० मध्‍ये १२५ मुले गुन्‍हेगारी कृत्‍यांत सहभागी झाली होती. २०२१ मध्‍ये हा आकडा वाढून १५१ झाला. त्‍यानंतर २०२२ मध्‍ये पुन्‍हा त्‍यात वाढ होऊन ही संख्‍या १८४ झाली.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍यात २०२० ते २०२२ या तीन वर्षांच्‍या काळात घडलेल्‍या गुन्‍हेगारीच्‍या घटनांत ४६० मुलांचा सहभाग होता.

२०२२ मध्‍ये राज्‍यात गुन्‍हेगारीशी संबंधित जितक्‍या घटना घडल्‍या, त्‍यात मुलांकडून झालेल्‍या गुन्‍हेगारीचा दर ४८.२ टक्‍के इतका राहिल्‍याचे सांख्‍यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नुकत्‍याच जारी केलेल्‍या ‘चिल्‍ड्रन इन इंडिया’ या अहवालातून समोर आले आहे.

राज्‍यात २०२० मध्‍ये १२५ मुले गुन्‍हेगारी कृत्‍यांत सहभागी झाली होती. २०२१ मध्‍ये हा आकडा वाढून १५१ झाला. त्‍यानंतर २०२२ मध्‍ये पुन्‍हा त्‍यात वाढ होऊन ही संख्‍या १८४ झाल्‍याचे अहवालातून दिसून येते. या तीन वर्षांच्‍या काळात संपूर्ण देशभरात ४,४०,३८४ मुले गुन्‍हेगारी कृत्‍यांमध्‍ये सहभागी झाली होती.

देशभरात झालेल्‍या एकूण गुन्‍हेगारी घटनांच्‍या तुलनेत हा दर ३६.६ टक्‍के इतका होता. या काळात गुन्‍हेगारीत अडकलेल्‍या मुलांच्‍या संख्‍येत मध्‍यप्रदेश (५६,५९६) अव्वलस्‍थानी होता. त्‍यानंतर महाराष्‍ट्रात (५२,३९४), उत्तर प्रदेश (५०,७९१) आणि पश्‍चिम बंगाल (२८,२७१) या राज्‍यांचा क्रमांक लागत असल्‍याचेही अहवालातून सादर करण्‍यात आलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

गुन्‍हेगारीत अडकलेल्‍या मुलांची टक्‍केवारी

वर्ष टक्‍के

२०१५ ४९.२३

२०१६ ४८.४६

२०१७ ४०

२०१८ ३८.६५

२०१९ ३६.५४

२०२० ३५.५३

२०२१ ४१.८०

२०२२ ५१.८४

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumai Mahim History: कळव्याला 2 फौजेमध्ये तुंबळ युद्ध झाले, भोज राजा प्राणास मुकला; इतिहास मुंबईच्या माहीमचा

Goa Politics: "भाजप प्रसिद्धीसाठी लोकांचा पैसा उधळतंय", रस्त्यांच्या दुरवस्थेवरून काँग्रेसची सरकारवर टीका

Asia Cup 2025 Prize Money: आशिया कप विजेता संघ होणार मालामाल; किती कोटी रुपये मिळणार? जाणून घ्या

Rama Kankonkar: लोक घराबाहेर पडून 'गोवा बंद' करू लागले तरी आश्चर्य वाटायला नको! रामा काणकोणकर हल्ला प्रकरण

Goa Rain Update: गोमंतकीयांनो सावधान! पुढील काही दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT