Illegal Gambling Case Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Gambling Case: कळंगुट येथील सट्टेबाजीवर केंद्रावर छापा, दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

भारत- बांगलादेश यांच्यात चालू असलेल्या ICC क्रिकेट विश्वचषक सामन्यासाठी सट्टेबाजी चालली होती.

Ganeshprasad Gogate

Goa Illegal Gambling Case: गुरुवारी कळंगुट बार्देश येथील एका अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या एका सट्टेबाजीवर पोलिसांनी कारवाई केलीय. याप्रकरणी प्रजीश (वय 36 वर्षे, रा. कुंदापुरा, उडुपी, कर्नाटक) आणि सुमन हर्षित, (वय 26 वर्ष, रा. शेषंब कंपाउंड, मंगलोर, कर्नाटक) या कर्नाटकच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालीय.

भारत आणि बांगलादेश यांच्यात चालू असलेल्या ICC क्रिकेट विश्वचषक सामन्यात सट्टा लावून मोबाईल फोन आणि लॅपटॉप वापरून जुगार खेळताना या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून 08 मोबाईल फोन, 01 लॅपटॉप आणि एक टेलिव्हिजन संच जप्त करण्यात आला.

ताब्यात घेलेल्या सर्व मुद्देमालाची रक्कम अंदाजे 1,50,000/- असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास कळंगुट पीएसआय राजाराम बागकर यांच्या देखरेखीखाली पीआय परेश नाईक आणि पर्वरीचे एसडीपीओ विश्वेश कर्पे करत आहेत.

गोव्यात गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आला असून चोरी, दरोडा, मारहाण अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांसोबतच जुगार, मटक्या सारखे अवैध प्रकारही वाढत आहेत.

सध्या क्रिकेटचे सामने सुरु असून देशभरात या सामन्यांवर सट्टेबाजीचे प्रकार सुरु झाल्याने पोलीस यंत्रणा अशा घटनांना आळा घालण्यासाठी सतर्कतेने काम करत आहे.

काही दिवसांपूर्वी परदेशात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवरील सट्टेबाजीप्रकरणी क्राईम ब्रँच पोलिसांनी करंझाळे - ताळगाव येथील एका फ्लॅटवर छापा टाकून छत्तीसगढच्या चारजणांना अटक केली होती. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे गोवा सट्टेबाजीचे केंद्र बनत असल्याचे बोलले आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT