Shocking Incident Kulem Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मोबाईलवरुन रागावले बाबा, दहावीत शिकणाऱ्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Shocking Incident Kulem: धारबांदोड्यातील कुळे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेवून जीवन संपवले.

Manish Jadhav

धारबांदोड्यातील कुळे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेवून जीवन संपवले. रविवारी (12 जानेवारी) रात्री वडील रागावल्याने रागाच्या भरात पीडिताने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन पीडिताचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दहावीत शिकणाऱ्या या मुलाने आपल्या वडीलांकडे मोबाईलचा हट्ट धरला होता. त्याचवेळी, रविवारी (12 जानेवारी) रात्री वडील त्याला रागावले. त्याच रागातून पीडिताने राहत असलेल्या भाड्याच्या खोलीतच गळफास घेवून जीवन संपवले. सदर पीडिताचे कुटुंब मूळचे बिहारचे (Bihar) असून गेल्या अनेक वर्षांपासून ते कुळे येथे राहत आहे.

मारहाणीची घटना

धारबांदोड्यातूनच हायस्कूलच्या शिपायाने ग्राऊंडवर खेळणाऱ्या मुलांना मारहाण केल्याची घटना रविवारी (12 जानेवारी) समोर आली होती. या मारहाणीत 4 मुले जखमी झाली होती. प्रेमानंद शंकर गावडे या शिपायाने मुलांना मारहाण केली. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. उपचारानंतर डॉक्टरांनी लगेच मुलांना डिस्चार्च देखील दिला. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी सदर आरोपी शिपायास तात्काळ ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT