Bardez Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मद्यपान करून बारमधून बाहेर पडले, दोघांमध्ये वादावादी झाले आणि... पुढे काय घडले?

Bardez Knife Attack: नानोडा-रेवोडा येथील संगम बारच्या बाहेर रात्री उशिरा झालेल्या भांडणात एकावर चाकूने हल्ला झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे

Akshata Chhatre

बार्देश: नानोडा-रेवोडा येथील संगम बारच्या बाहेर शुक्रवारी (दि. ७ फेब्रुवारी) रात्री उशिरा झालेल्या भांडणात एकावर चाकूने हल्ला झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. रात्री ११:५०च्या सुमारास बारच्याजवळ दोन मद्यावस्थेत असलेल्या इसमांमध्ये वादावादी झाली, पुढे याचं रूपांतर भांडणांमध्ये झालं आणि एकाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला चढवला.

नीरज हरगापुरे (३८, रा. नानोडा) असे आरोपीचे नाव असून त्याने झालेल्या वादात सर्वेश संतोष बागकर (३४) याच्यावर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केला. त्याने केलेल्या चाकूच्या वरात बागकर याच्या तोंडावर आणि हातावर जखमा झाल्या आहेत.

मारामारीच्या या प्रसंगात बागकर याला गंभीर दुखापत झाली आणि त्याच्यावर सुरुवातीला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारणासाठी त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. कोलवाळ पोलिसांना याची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा केला. या घटनेचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करवून घेत पोलिसांनी नीरज हरगापुरे याच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून आरोपी त्यांच्या ताब्यात आहे.

या घटनेचा एकूण तपास उत्तर गोव्याचे एसपी अक्षत कौशल, म्हापशाचे डीवायएसपी संदेश चोडणकर आणि कोलवाळचे पीआय विजय राणे यांच्या देखरेखीखाली केला जात आहे, पीएसआय आणि आयओ विष्णू जाधव चौकशी पथकाचे नेतृत्व करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT