attempted murder in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: जमिनीच्या वादातून जोडप्यावर प्राणघातक हल्ला, CCTV फोडले, आरोपी 'अल्पवयीन' म्हणून मोकाट

Mandrem Crime News: काही स्थानिकांकडून हल्ला चढवण्यात आला यावेळी मदतीला धावून आलेल्या पत्नीला देखील मारहाण

Akshata Chhatre

मांद्रे: गोव्यातील मांद्रे परिसरात एक भयंकर प्रसंग घडला आहे. मांद्रे येथील रहिवासी शांबा नाईक आणि त्यांची पत्नी अन्नपूर्णा नाईक यांना मारहाण करण्यात आलीये. माध्यमांना शांबा नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मार्च रोजी मांद्रे पंचायतीत बेकायदेशीर जमिनीच्या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याने ते पंचायतीत निघाले असताना काही स्थानिकांकडून त्यांच्यावर हल्ला चढवण्यात आला. यावेळी त्यांच्या मदतीला धावून आलेल्या त्यांच्या पत्नीला देखील मारहाण करण्यात आली. पोलिसांनी देखील या प्रसंगाची तक्रार नोंदवण्यात उशीर केल्याचं त्यांनी सांगितलंय.

रॉड आणि धारधार हत्याराने वार

पीडित शांबा नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायतीत गेल्यानंतर त्यांना एका पेपरवर सही करायला सांगितलं आणि यानंतर तिथेच उपस्थित असलेल्या जगन्नाथ नाईक, रजत नाईक, प्रशांत नाईक यांनी त्यांना मारायला सुरुवात केली. त्यांच्यावर मागून रॉडने वार करण्यात आला तसेच धारधार हत्याराने सुद्धा बरेच वार झाले.

पतीला सोडवण्यासाठी आलेल्या अन्नपूर्णा नाईक यांना देखील मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्यावर मागून दोनवेळा रॉडने वार केल्याचं त्या सांगतात. हा संपूर्ण प्रकार घडत असताना पंचायतीच्या माणसांकडून कुठलीही हालचाल झाली नाही याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला तसेच हे प्रकरण पुर्नविनियोजीत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणानंतर त्यांना बांबोळीमध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली गेली अशी माहिती या जोडप्याने दिलीये.

यापूर्वी दिली होती मारण्याची धमकी!

अन्नपूर्णा नाईक यांनी सांगितल्यानुसार, काही दिवसांपूर्वी त्यांना रजत नाईक नावाच्या इसमाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका संध्याकाळी गिरणी बंद करून घरी परतत असताना रजत नाईक याने त्यांना धमकावलं होतं आणि रक्तपात करवण्याची धमकी दिली होती. जोडप्याने दिलेल्या माहितीनुसार रजत नाईककडून यापूर्वी देखील त्यांना बराच त्रास देण्यात आलाय. त्यांच्या घराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे फोडणं, गाड्या फोडण्यासोबतच मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या मात्र पोलिसांनी तो अल्पवयीन आहे असं म्हणत कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

Mangal Gochar 2026: नोकरीत प्रमोशन अन् धनलाभाचे सुवर्ण योग! मृगशिरा नक्षत्रात मंगळाचे बली गोचर! ''या' राशींचे नशीब चमकणार

'CJP Protest' निर्णायक टप्प्यात! मोदी सरकारकडून तीनपैकी दोन मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शनिवारी निर्णय

SCROLL FOR NEXT