Police FIR Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अंडर ट्रायल कैदी अझीझवर हल्ला करणाऱ्या कैद्याविरोधात गुन्हा दाखल; कोलवाळ पोलिसांची कारवाई!

Colvale Police Case Filed Against Dinesh Swansi: अझीझ अस्लाम आसिफ (रा. तुमकुरु, कर्नाटक) याच्यावर कोलवाळ कारागृहात पेन हल्ला केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी कैदी दिनेश स्वानशी (झारखंड) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

Manish Jadhav

म्हापसा: अट्टल चोरटा असलेला अंडर ट्रायल कैदी अझीझ अस्लाम आसिफ (रा. तुमकुरु, कर्नाटक) याच्यावर कोलवाळ कारागृहात पेन हल्ला केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी कैदी दिनेश स्वानशी (झारखंड) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

कैद्याविरुद्ध गुन्हा नोंद

कोलवाळ कारागृहाचे उपअधीक्षक चंद्रकांत हरिजन यांनी शुक्रवार, 14 रोजी कोलवाळ पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी संशयित अंडर ट्रायल कैद्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

अट्टल चोरटा अझीझवर पेन हल्ला

दरम्यान, ही हल्ल्याची घटना सोमवार, (10 फेब्रुवारी) रात्री उशिरा कारागृहात घडली होती. अझीझ आसिफ याच्यावर झोपलेल्या अवस्थेत हा हल्ला झाला होता. लगेच त्यास कारागृह कर्मचाऱ्यांनी म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी पुन्हा कारागृहात पाठवले होते. या हल्ल्यात कैदी अझीझ आसिफ हा गंभीर जखमी झाला होता. हल्लेखोराने आपल्यावर कशासाठी हल्ला केला हे आपणास माहिती नाही. मी झोपलेलो असताना अचानक पेनाच्या साहाय्याने संशयिताने माझ्यावर हल्ला चढवला असे, जखमी अझीझने सांगितले होते.

कोलवाळ कारागृहात वारंवार घटना घडतायेत

दरम्यान, कोलवाळ कारागृहात वारंवार अशा घटना घडत असतात. एक वर्षापूर्वी कारागृहात टोळीयुद्ध रंगले होते. यात काही कैदी जखमी झाले होते. तसेच, एका कैद्याने वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याशिवाय कैदी राजू दास याने सॅनिटायझर पिऊन तसेच अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कोलवाळ या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

Goa Live Updates: नाणूस येथील सभागृहाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT