Goa Crime Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: चोरांचा सुळसुळाट! परप्रांतीयच नव्हे, तर स्थानिकांचाही सहभाग

Goa Crime News: गोवा राज्यात पावसाळ्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढते.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: दरवर्षी राज्यात पावसाळ्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढते. यंदाही चोरांनी आपली चुणूक लोकांना आणि प्रशासनालाही दाखवून दिली आहे. अनेक ठिकाणी डल्ला मारून पलायन करण्यात चोर यशस्वी ठरले आहेत. राज्यातील चोरी प्रकरणांच्या तुलनेत पोलिसांना आरोपींना पकडण्यात आलेले यश नगण्य आहे. यामुळे जनता पुरती धास्तावली असून पोलिस यंत्रणा अधिक कार्यक्षम व्हायला हवी, असे लोकांचे म्हणणे आहे.

बार्देश तालुक्यात पुन्हा एकदा चोरांनी डोके वर काढले आहे. काही प्रकरणांत संशयित हे संबंधित आस्थापनात किंवा घरात काम करणारे कामगार आहेत. त्यांनी आपल्या साथीदारांसह परिसराची रेकी करीत हे गुन्हे केल्याचे पोलिस तपासात निदर्शनास आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये हणजूण पोलिस स्थानक क्षेत्रात पश्चिम बंगालमधील संशयिताने आसगावातील व्हिलामध्ये चोरी केली. संशयिताने लॉकर तोडून 12 लाखांची रोकड लंपास केली. याप्रकरणी तक्रारदाराच्या एका कर्मचाऱ्यानेच या गुन्ह्याची कबुली दिली. हणजूण पोलिसांनी कोलकाता येथून 20 वर्षीय बिश्वजीत गौर याला अटक करून त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त केला.

अशाच प्रकारे जुलैमध्ये हणजूण पोलिसांनी घरफोडी प्रकरणी पाचजणांना अटक केली होती. संशयितांनी सोने, चांदी, प्लॅटिनम आणि हिऱ्याचे दागिने व 3 हजार युरो असा 15 लाखांचा ऐवज लुटला होता. या प्रकरणातील चार संशयित हे बिहार तर एकजण आसगावातील होता. या प्रकरणातील स्थानिक संशयित हा तक्रारदाराच्या रेस्टॉरंटमध्ये कामाला होता. तोच या गुन्ह्याचा मास्टर माईंड होता.

कोलवाळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत ऑगस्टमध्ये थिवीमधील एका मोबाईल शॉपीमधील 64 हजारांचे सात मोबाईल संच व रोकड संशयितांनी लंपास केली होती. याप्रकरणी पोलिसांनी बिहार व आसाममधील दोघा चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला.

11 सप्टेंबर रोजी सांगोल्डा येथील एका रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्याने रेस्टॉरंटमधील रोकड व स्कूटर मिळून 1.40 लाखांचा मुद्देमाल चोरला. संशयितास बंगळुरूमधून अटक केली. हा संशयितही रेस्टॉरंटमध्ये कामाला होता.

कळंगुट पोलिसांनी ऑगस्टमध्ये बागा येथील वाहनतळावरील कारमधील मोबाईल लंपास केल्याप्रकरणी चौघांना अटक केली होती. चोरीचा ऐवज पर्यटकाचा होता. हे संशयित कळंगुटचे रहिवासी असले तरी मूळचे गदग-कर्नाटकमधील होते.

ऑगस्टमध्ये म्हापसा पोलिसांनी मडगाव येथील एका हिस्ट्रीशिटर आरोपीस अटक केली होती. संशयिताने हळदोणामध्ये तीन दुचाकींच्या डिकीमधील मोबाईल तसेच रोकड लंपास केली होती. ही घटना चर्चच्या पार्किंग तळावर घडली होती. याप्रकरणी अन्सर नारंगी या संशयिताला अटक झाली होती. अलीकडेच म्हापसा पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका नामांकित क्लिनिकमध्ये चोरी झाली होती.

अल्पवयीनांचाही चोरी प्रकरणांमध्ये सहभाग

म्हापसा पोलिसांनी ऑगस्टमध्ये आराडी-पर्रा येथील 15 लाखांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावला. म्हापसा पोलिसांनी चार संशयितांना अटक केली. यातील तिघे अल्पवयीन होते, तर ज्युएल शेख (22) याला अटक केली होती. हा कळंगुटचा रहिवासी असला तरी तो मूळचा पश्चिम बंगालचा. संशयितांनी बंगल्यामधून लेन्स, कॅमेरा, आयपॉड, मोबाईल संच चोरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT