Goa Crime
Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : ...तरच लैंगिक अत्याचार थांबू शकतील; वाचा ‘सडेतोड नायक’मध्ये मान्यवरांनी मांडलेली मतं

विलास ओहाळ

विलास ओहाळ

Goa Crime विद्यालयांमध्ये लहान मुलांच्यावरील लैंगीक शोषणाबाबत तक्रार देण्यासाठी पालक पुढे येतात, परंतु पौंगडावस्थेतील मुलींबाबत होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविषयी बदनामीला घाबरून पालक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.

त्याचबरोबर त्यांच्यावर सामाजिक दबावही असतो, असे मत मान्यवरांनी गोमन्तक टीव्हीवरील शुक्रवारच्या सडेतोड नायक या कार्यक्रमात व्यक्त केले.

‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी ‘शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनी किती सुरक्षित आहेत?’ या विषयावरील चर्चेत ‘अर्ज'' या संस्थेच्या ज्युलियाना लोहार, ‘बायलांचो साद’च्या सबिना मार्टिन्स, प्रा.आसावरी नायक यांनी सहभाग घेतला होता.

राज्यात सध्या विद्यालयांमध्ये घडत असलेल्या घटनांकडे कसे पाहतात, यावर लोहार म्हणाल्या, की लहान मुलांच्याबाबतीत लैंगीक छळाच्या घटना घडतात, तेव्हा पालक त्याबाबत पुढे येतात, तसेच सर्व यंत्रणा त्यांना सहकार्य करते.

अशा घटना घडल्यानंतर शैक्षणिक संस्थांकडे वाईट नजरेने पाहिले जाऊ नये. सबिना यांच्या मते, तक्रारींचे प्रमाण फार कमी आहे, परंतु ज्यावेळी अशा घटना घडतात तेव्हा संस्था ते प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करतात.

जर संस्थेकडून काही पावले उचलली गेली नाहीत, तर पालकांमध्ये संस्था सुरक्षित नसल्याचा संदेश जातो, त्यामुळे अशा घटना समाजासमोर येत नाहीत.

बदनामी होईल याची भीती संस्कृतीमुळे येते, एका बाजूला कायदा असतानाही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मुलांमध्येही पीडित कोण, याविषयी उत्सुकता असल्याचे दिसून येते.

चांगल्या चारित्र्याच्या महिलेचा आपण स्वीकार करतो, परंतु मुलींनी तोकडे कपडे घातले तर ती मुलगीच एकप्रकारचा संदेश देते, असे म्हटले जाते, असे आसावरी नायक यांनी सांगितले.

दहा वर्षांच्या मागे विचार केला तर काही पालक-शिक्षक संघटना लैंगिक अत्याचाराविषयी जनजागृतीसाठी बोलावत. परंतु आता अनेक संस्थांमध्ये जागृतीसाठी बोलाविले जाते.

अशा कार्यक्रमात केवळ वाईट स्पर्शाविषयी माहिती देणे आवश्‍यक नसते, तर त्यानंतरच्या घ्यावयाची काळजी अधिक महत्त्वाची असते आणि त्या पुढचे पाऊल उचलावे लागले तर पोलिसांत तक्रार करणे आवश्‍यक असते.

- ज्युलियाना लोहार, ‘अर्ज’

लैंगिक अत्याचाराविषयी प्रतिबंधात्मक कार्यक्रम ज्या पद्धतीने शैक्षणिक संस्थांमध्ये व्हायला हवेत, ते होताना दिसत नाहीत. खरेतर शिक्षकांनी मुलांना मुलींकडे कसे वागावे, हे शिकवणे आवश्‍यक आहे.

शैक्षणिक संस्थांमध्ये, तसेच घरांमध्येही मुलांवर अत्याचार घडतात. गोव्यात असे दिसते की, लहान मुलांवर अत्याचार झाल्यास तक्रार दिली जाते, पण पौंगडावस्थेतील मुलीबाबत घटना घडली की तत्काळ तिच्या चारित्र्याविषयी चर्चा सुरू होते.

- सबिना मार्टिन्स, बायलांचो साद

स्वतःविषयी काही अघटित घटना घडल्या, तर शिक्षकांना सांगितल्यास आपली बदनामी होईल, प्रतिमा डागळेल, अशी भीती मुलांमध्ये असते. त्यामुळे खुपशा घटना विद्यार्थी समुपदेशकांशी चर्चा करतात.

अनेक संस्थांमध्ये समुपदेशकही अशा विषयांबाबत जागृती करतात. तर दुसरीकडे पौंगडावस्थेतील पीडित विद्यार्थिनी पालकांकडे सांगण्यास भीतात, पालकांना वाईट वाटेल म्हणून त्या घडलेल्या घटना सांगत नाहीत.

याशिवाय अत्याचार करणारा श्रीमंत कुटुंबातील असेल तर काहीवेळा संस्था पीडितेवर दबाव आणतात.

-प्रा. आसावरी नायक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Afghanistan Floods: अफगाणिस्तानात विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; बागलान प्रांताला सर्वाधिक फटका!

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

POK मध्ये पाकिस्तान सरकारविरोधात ‘काश्मीरी जनता’ रस्त्यावर, पाक रेंजर्सची दडपशाही; व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT