crime case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा! शाळेतील विद्यार्थिनीचे अपहरण करून शिक्षकाने केला विनयभंग

Goa Crime Case: अशा घटनांमुळे आता शाळेतील विद्यार्थिनी तरी सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित होतोय.

Ganeshprasad Gogate

Goa Crime Case: एका सरकारी शाळेतील क्रिडा प्रशिक्षकाने त्याच शाळेतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मोपा पोलिसांनी संबंधितांविरुद्ध एफआयआर नोंदवला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कृत्यांमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे मुली, युवती, स्त्रियांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अशाच प्रकारची एक घटना वेर्णा येथे घडली. कामगार पुरवठा करणाऱ्या व्यक्तीने मजूर महिलेवर बलात्कार केल्याची घटना 12 फेब्रुवारी रोजी घडली होती.

हे कृत्य केल्यावर सदर इसमाने प्रकरणाची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी पीडित महिलेला दिली होती.

मात्र असे असूनही संबंधित महिला आज गुरुवारी वेर्णा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आणि तिने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. वेर्णा पोलिसांनी या प्रकरणाची दाखल घेत आरोपीला तातडीने अटक केलीय.

काल म्हणजेच बुधवारी उसगाव येथे कॉलेजला जाणाऱ्या तरुणीवर 'आपल्या प्रेमाला नकार दिल्याच्या रागाने' एका युवकाने बियरची बाटली मारून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती.

त्या युवतीवर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली होती. या दोन्ही घटनांमधून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे बोलले जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

Goa Today's News Live: मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

Heart Attack: तुमचं हृदय सेफ आहे का? हिवाळ्याच्या दिवसांत हर्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय; 'हे' उपाय करा, स्वतःची काळजी घ्या

IFFI 2024: ‘विषय हार्ड’; मानवी संबंधांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT