Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: इंस्टाग्रामवर ओळख करून मित्रांच्या साहाय्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण

तिघांना अटक : म्हापसा पोलिसांकडून सहा तासांत प्रकरणाचा छडा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime इंस्टाग्रामवरील ओळखीचे रूपांतर मैत्रीत करून मुख्य संशयिताने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून आपल्या इतर मित्रांसोबत तिचे कथित अपहरण केले. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी तीन युवकांना अटक केली. या अपहरण प्रकरणाचा छडा म्हापसा पोलिसांनी सहा तासांत लावत पीडित मुलीची संशयितांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली.

याप्रकरणी पोलिसांनी नरेंद्र ऊर्फ बादल सिंग (चिखली, कोलवाळ), आरॉन पर्सी मोनिज (अस्नोडा), आयुष मांद्रेकर (सिरसई) या तिघांना अटक केली. पीडित मुलीची संशयित नरेंद्र याच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली.

या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर संशयित नरेंद्र याने तिला आपल्यासोबत येण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार, संशयिताने आपले मित्र आयुष व आरॉनशी संपर्क साधून पीडितेला अस्नोडा येथील आरॉनच्या घरी नेऊन ठेवले.

पीडितेच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी व पोलिस निरीक्षक सीताकांत नायक यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली.

ज्यामध्ये उपनिरीक्षक गौरव नाईक, उपनिरीक्षक दिनेश कुमार मुखिया, उपनिरीक्षक विराज कोरगावकर, महिला उपनिरीक्षक रिचा भोसले, हेडकॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, राजेश कांदोळकर, अक्षय पाटील, महिला पोलिस कॉन्स्टेबल रंजना परब यांनी फिर्यादीच्या घरापासून जवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक सर्व्हेलियन्सच्या आधारे पीडितेचा यशस्वीरीत्या शोध घेतला.

तपासाला तंत्रज्ञानाची जोड

  • पीडितेच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देताच, पोलिसांनी लगेच हालचाली सुरू केल्या. तसेच तांत्रिक व मानवी सर्व्हेलियन्सच्या आधारे पीडिता ही अस्नोडामध्ये असल्याचे समजले. त्यानुसार, पोलिसांनी अस्नोडामधून मुलीची सुटका केली.

  • पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ व गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अन्वये गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली. या संशयितांना म्हापसा न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर, पीडितेची रवानगी मेरशीमधील अपना घरात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway Accident: गोवा-बेळगाव महामार्गावर थरार! बस दरीत कोसळता कोसळता वाचली, अनमोड घाटात काय घडले वाचा

Goa Crime: सिलिंडर डोक्यात हाणला, रोडरेजवरून 2 सख्ख्या भावांना चार ते पाच जणांकडून मारहाण

Team India Captain: मोठा ट्विस्ट! शुभमन गिल नाही तर 'श्रेयस अय्यर' असेल नवा कर्णधार, मोठी अपडेट आली समोर

Goa Food Adulteration Cases: पाच वर्षांत राज्‍यात अन्न भेसळीची 43 प्रकरणे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

Horoscope: कर्क राशीत शुक्राचे आगमन; प्रेम, नोकरी आणि व्यवसायात 'या' 5 राशींना मिळणार अपार यश

SCROLL FOR NEXT