Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: हळदोणे येथे पूर्ववैमनस्यातून सुरी हल्ला; तिघांवर गुन्हा

Goa Crime Case: संशयितांची ओळख पटली असून, म्हापसा पोलिस या त्यांच्या मागावर आहेत.

Ganeshprasad Gogate

Goa Crime Case: खोर्जुवे, हळदोणा येथील एका 23 वर्षीय युवकावर तिघा अनोळखी व्यक्तींकडून प्राणघातक सुरी हल्ला झाला. यात युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रणव फडते असे जखमीचे नाव असून, म्हापसा पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (ता.15) रात्री 11.30 च्या सुमारास गोळजुवे, खोर्जुवे येथे घडली. यावेळी तीन अनोळखी संशयित हे कार गाडीमधून आले असता, यातीन एकाने प्रणव फडते याच्यावर अचानक सुरी हल्ला चढविला.

यावेळी सुरीचा वार अडविण्यासाठी प्रणव याने आपले हात पुढे केले असता, त्याच्या दोन्ही हातांना घाव लागून तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर, संशयित घटनास्थळावरुन पसार झाले.

संशयितांची ओळख पटली असून, म्हापसा पोलिस या त्यांच्या मागावर आहेत. यापैकी मुख्य संशयित हा डोंगरी परिसरातील असल्याचे समजते.

गोव्यातील वाढत्या गुन्हेगारी हे एक ज्वलंत उदाहरण असून दिवसेंदिवस राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बोलले जातेय.

दोन दिवसांपूर्वी उसगाव येथे एका तरुणीवर प्रेमप्रकरणातून हल्ला करत तिला जखमी केल्याचे समोर आले होते. सदर तरुणीच्या डोक्यात बियरची बाटली मारत तिला गंभीररित्या जखमी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT