vasco News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Branch : कासावलीत जुगार अड्ड्यावर छापा; 15 संशयितांना अटक

गुन्हा शाखेची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Raid on gambling dens in Cansaulim : कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी आणि जुगार- मटका खपवून घेतला जाणार नाही असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्यानंतर पोलिसांनी मटका व जुगारी अड्ड्यावर कारवाई करण्याचे सत्र चालू केले आहे.

मुरगाव येथील कासावलीत गुन्हा शाखेने जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. ही कारवाई आज करण्यात आली. या कारवाईत एकूण 15 संशयितांना अटक करण्यात आली असून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुरगाव येथील कासावली येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कासावलीतील जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

या छाप्यात एकूण 15 संशयितांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून एकूण 2 लाख 73 हजार रुपयांची रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी आणि जुगार- मटका खपवून घेतला जाणार नाही असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ''हॅलो गोयंकार'' या कार्यक्रमात सांगितले होते.

"राज्यात मटका, जुगार किंवा कोणत्याही गुन्हेगारी बाबींना थारा दिला जाणार नाही. यासाठी पोलिसांना आवश्यक असलेल्या सूचना देण्यात आल्या असून प्रामुख्याने झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आमच्या सरकारचे प्राधान्य असेल."

लोकांनी आपल्या तक्रारी समस्या लिहून उपजिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार पेटीत टाकाव्यात. या तक्रारींची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT