Goa Crime Branch of Investigation Department seized 18 kg of narcotics Dainik Gomantak
गोवा

गुन्हे अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँच कडून हडफडे येथे 18 किलो अमली पदार्थ जप्त..!

केलेल्या कारवाईत दोघा बंधूंना अटक..

दैनिक गोमन्तक

पणजी: गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने (Goa Crime Branch of Crime Investigation Department) काल हडफडे येथे केलेल्या कारवाईत दोघा बंधूंना 18 किलो गांजासह अटक केली. त्या गांजाची किंमत सुमारे 18 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली. या गांजाप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे बाला जडा (30 वर्षे) व अनिल जडा (20 वर्षे) अशी असून ते दोघेही मूळ आंध्रप्रदेशमधील आहेत.

त्यांनी हा गांजा कोठून आला त्याची कसून चौकशी सुरू असून त्यामध्ये आणखी काहीजण गुंतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत पोलिसांनी व्यक्त केले.

राज्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पर्यटक(Tourist) येत असून ठिकठिकाणी सुरू असलेल्या संगीतरजनी नृत्य पार्ट्यांमुळे ड्रग्जचाही व्यवसाय तेजीत सुरू आहे. महागडे ड्रग्ज परवडत नसल्याने अनेक युवा पर्यटक गांजाकडे वळत आहे. त्यामुळे हे संशयित झटपट पैसा जमविण्याच्या इराद्याने ते गोव्यात आले होते, असे प्रथमदर्शनी चौकशीत उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT