पणजी: ‘कुंपणच जेव्हा शेत खाते तेव्हा...’ असा प्रश्न उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देईकर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार गुन्हे शाखा कार्यालयाच्या परिसरातच घडल्याचे सांगण्यात येत आहे. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित कायद्याच्या कठोर कलमांखाली संबंधित निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेची ओळख गुप्त ठेवण्यासाठी तक्रारीचे सविस्तर तपशील अद्याप गोपनीय ठेवले असले, तरी पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार सध्या या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.