Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: विद्यमान आमदाराचा अश्‍लील व्हिडिओ बनवून 5 कोटींची खंडणी मागणाऱ्याला अटक; गोवा पोलिसांची कारवाई

Goa Police: क्राईम ब्रँच पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका आमदाराने तक्रार दाखल केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एका विद्यमान आमदाराची छायाचित्रे एका महिलेसोबत मॉर्फ करून अश्‍लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल करण्याची धमकी देऊन ५ कोटींची मागणी करणारा कुकेश रावता (ओडिशा) याला क्राईम ब्रँच पोलिसांनी अत्याधुनिक तपास यंत्रणेच्या साहाय्याने अटक केली. आत्तापर्यंत त्याने ५ लाखांची खंडणी वसूल केल्याची कबुली दिली आहे.

क्राईम ब्रँच पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका आमदाराने तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी असे म्‍हटले होते की, अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून (Mobile) व्हिडिओ कॉल केला व त्यांच्या नकळत तो रिकॉर्ड केला होता. त्यानंतर त्या व्यक्तीने आपली छायाचित्रे एका महिलेसोबत जोडून त्याचा अश्‍‍लील व्हिडिओ मला पाठविला.

तसेच, तो सोशल मीडियावर (Social Media) व्‍हायरल करण्याची धमकी दिली व तसे न करण्‍यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागितली होती. त्या आमदाराने सुरवातीला घाबरून ५५ हजार रुपये त्‍या व्यक्तीने मोबाईलवर पाठविलेल्या बँक खात्यात जमा केले होते. त्यानंतर काही दिवसांनी या व्यक्तीने ५ कोटींची मागणी केली. त्यामुळे या आमदाराने २ नोव्हेंबरला तक्रार दिल्यावर सायबर पोलिसांनी संशयिताला काल शिताफीने अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT