Goa Human Trafficking Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: विदेशी महिलांना नोकरीसाठी भारतात बोलावून करायला लावायची वेश्‍या व्यवसाय; हरामच्या पैशांवर केनियन 'नॅन्सी' करायची मौजमजा

Crime Branch Raid: आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीप्रकरणाचा पर्दाफाश करत गुन्हे अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने केनियन महिला नॅन्सी किंगओरी ऊर्फ अलायन हिला बंगळुरू येथून अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीप्रकरणाचा पर्दाफाश करत गुन्हे अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने केनियन महिला नॅन्सी किंगओरी ऊर्फ अलायन हिला बंगळुरू येथून अटक केली. तिला म्हापसा न्यायालयाने सात दिवसांचा पोलिस रिमांड दिला आहे.

विदेशी महिलांना नोकरीसाठी भारतात बोलावून त्यांना वेश्‍या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे चौकशी उघड झाले आहे. एका पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे तपास करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्राईम ब्रँच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विदेशी महिलेला वेश्‍या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्या पैशांवर संशयित नॅन्सी किंगओरी ही मौजमजा करत होती. यासंदर्भात पीडित महिलेने १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

तेव्हापासून क्राईम ब्रँचचे पोलिस पथक संशयिताचा शोध घेत होती. तिला तक्रार दाखल झाल्याचीमाहिती मिळताच ती गोव्यातून पसार झाली होती. तिच्याविरुद्ध वेश्‍या व्यवसाय प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४,५,८ व बीएनएस कलम १४३ खाली गुन्हा नोंदवण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT