Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : कळंगुटमध्ये ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा; पाचजण अटकेत

कळंगुट येथे क्राईम ब्रँचने काल मंगळवारी मध्यरात्री फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन गेमिंगवर छापा टाकला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : गोवा पोलिसांनी गेल्या काही दिवसात राज्यात सुरु असलेल्या अवैध कारवायांवर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. कळंगुट येथे क्राईम ब्रँचने काल मंगळवारी मध्यरात्री फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच रोख रक्कम जप्त केली आहे.

गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली कळंगुट परिसरात छापेमारी केली. यात कळंगुटमधील एनेट बीच अपार्टमेंटमधील एका बंद खोलीत ऑनलाईन जुगार अड्डा सुरु होता. पोलिसांनी याप्रकरणी अमन अगरवाल, राकेश कुमार, सागर भागवानी, विशाल कुमार आणि करन पखानी अशा पाच आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी मूळचे छत्तीसगडचे असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा हे सर्व आरोपी ऑनलाईन जुगारात गुंतलेले होते. पोलिसांनी बेसावध असलेल्या आरोपींना रंगेहाथ पकडत त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, इंटरनेट कनेक्शनसाठी वापरलं जाणारं राऊटर, तसंच 3200 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

दरम्यान सोनाली फोगट हत्या प्रकरणानंतर गोवा पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहे. सोमवारी मध्यरात्री सिद्धेश हलगेकर आणि विनायक जुवारकर या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 1 किलो 100 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मडगावमध्ये ईएसआयएस हॉस्पिटलजवळील रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. यात प्लास्टिकच्या पिशवीतून फळांच्या खाली लपवलेला गांजा घेऊन जात असताना क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली. आरोपींकडून 1 किलो 100 ग्रॅम वजनाचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींमध्ये यात सिद्धेश हलगेकर (रा. शिरवई केपे) या 23 वर्षीय तरुणासह विनायक जुवारकर या मडगाव कोंब येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT