Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! सात वर्षीय मुलीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार, 47 वर्षीय आरोपीला अटक; डिचोली पोलिसांची कारवाई

minor girl assault bicholim : डिचोलीत एका सात वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका ४७ वर्षीय व्यक्तीने कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Sameer Amunekar

डिचोली: डिचोलीत एका सात वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका ४७ वर्षीय व्यक्तीने कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, वेळगे येथील संशयित आरोपी सत्यवान गावकर याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सत्यवान गावकर (वय ४७) याने अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केला. पोलिसांनी घटनेनंतर तातडीने तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली.

गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार देखील डिचोली पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी योग्य कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

याआधी, एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी डिचोली पोलिसांनी महाराष्ट्रातील कणकवली येथील एका १९ वर्षीय युवकाला अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं करत अवघ्या २४ तासांत पीडित मुलीची सुखरूप सुटका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT