Mapusa Detention Center Dainik Gomantak
गोवा

Mapusa Detention Center: पोलिसांच्या हातावर तुरी! म्हापसा डिटेन्शन सेंटरमधून 3 बांगलादेशी फरार

Bangladesh Citizen: डिसेंबर 2023 पासून म्हापसातील डिटेन्शन सेंटरमध्ये असलेले हे तीन बांगलादेशी पळाले.

Manish Jadhav

राज्यात पोलिसांचा धाक उरला आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. होय, म्हापसामधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तीन बांगलादेशी नागरिक फरार झाले. डिसेंबर 2023 पासून म्हापसातील डिटेन्शन सेंटरमध्ये असलेले हे तीन बांगलादेशी पळाले. आज (रविवार, 11 ऑगस्ट) पहाटे तीन वाजता ते फरार झाल्याची बातमी समोर आल्याने एकच हल्लकल्लोळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पेडणे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात या तीन बांगलादेशी नागरिकांना पकडले होते. नंतर त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा सोडून देण्यात आले होते. त्यानंतर काही कारणांनी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांचा हा पकडापकडीचा खेळ सुरु होता. डिसेंबर 2023 पासून म्हापसा येथील डिटेन्शन सेंटरमध्ये हे बांगलादेशी नागरिक होते. दरम्यान, आता पोलिसांच्या तावडीतून कसे निसटले? डिटेन्शन सेंटरमधील लोकांचा त्यांच्या सुटकेत हात आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी, हणजूण पोलिसांनी अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गिनी देशातील नागरिकाला अटक केल्याची घटना समोर आली होती. हणजूण येथील XOXO Bar and Restaurant मध्ये 14 नोव्हेंबरला मध्यरात्री पोलिसांनी छापेमारी केली होती. तेव्हा मलाम कामारा नामक गिनी नागरिकांकडे 01.74 ग्रॅम 'कोकेन' आणि 03.12 ग्रॅम 'अल्थेरटो' ड्रग्ज आढळून आले होते. या ड्रग्जचे याचे बाजारमूल्य अंदाजे 2 लाख होते. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT