covid-19 cases Dainik Gomantak
गोवा

Goa Covid News: राज्यभरात 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 893

दैनिक गोमन्तक

गेल्या दोन वर्षाच्या कोरोना लाटेच्या तुलनेत गेल्या पाच ते सहा महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ती पुर्ण थांबलेली नाही. यामूळे राज्यातील नागरिकांना कोरोना नियमावली पाळणे हिताचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात 1327 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 144 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

(Goa Covid News: 144 new corona patients and 125 recover )

आज 125 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या आकडेवारी नुसार राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 893 झाली आहे. तर रुग्णांचा रिकव्हरी दर 98.8 टक्के इतका झाला आहे. गोव्यातील नागरिकांना कोरोनाला गांभिर्याने घेणे गरजेचे नसले तरी संपूर्ण कोरोना फैलाव थांबला नसल्याने कोरोना नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे.

तसेच राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 24,8100 इतकी झाली आहे. तर राज्यातील एकूण बाधितांची संख्या 252948 इतकी झाली आहे. तसेच आज राज्यातील कोणत्या ही रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.

Goa Rain Update: येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता - IMD

गेले काही दिवस दडी मारलेला पाऊस राज्यात आता दमदार हजेरी लावणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. गेले काही दिवस राज्यात प्रखर सुर्यकिरण नसले तरी पावसाने ही दडी मारल्याचं चित्र आहे. त्यामूळे डोंगर माथ्यावर असणाऱ्या खरीप पिकांना आता पाण्याची गरज आहे. असे असाताना पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT