Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोरोनाचे नवे 135 बाधित ; एक रुग्णालयात

राज्यात आतापर्यंत 2 लाख 47 हजार 364 जणांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 42 हजार 739 रुग्ण बरे झाले.

दैनिक गोमन्तक

पणजी : देशभर वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येसह राज्यातील कोरोना बाधितांची संख्याही झपाट्याने वाढत असून संक्रमण दर (पॉझिटिव्हिटी रेट) तब्बल 11.67 टक्क्यांवर पोहोचला आहे.

मंगळवारी उपचारासाठी एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रोजच परिस्थिती गंभीर बनत असल्याने कोरोनासंबंधीच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्य साथरोग तज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी केले आहे. (Goa Corona Updates)

डॉ. बेतोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात मंगळवारी कोरोनाचे नवे 135 रुग्ण सापडले असून संक्रमणाचा दर 11.66 टक्क्यांवर पोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 792 झाली आहे.

राज्यात आतापर्यंत 2 लाख 47 हजार 364 जणांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 42 हजार 739 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्के इतके आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नसल्याने एकूण मृत्यूचा आकडा 3 हजार 833 आहे. मंगळवारी 1157 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी 135 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curti Khandepar: फोंडा मतदारसंघाचा 50% भाग व्यापणारी 'कुर्टी - खांडेपार' पंचायत! झेडपी आरक्षण; आशा, निराशा व समीकरणे

Palolem Beach: पाळोळे किनाऱ्यावर वाद पेटला! पर्यटक बोटमालकांच्या 2 गटांत वितुष्ट; समझोत्यानंतरही धुसफूस सुरुच

India A vs SA: सिराज, कुलदीप, प्रसिध कृष्णा फेल! भारतीय गोलंदाजांचा 'फ्लॉप शो'; दक्षिण आफ्रिका संघाचा 417 धावांचा पाठलाग

Goa opinion: लडाखने जे करून दाखवले ते गोव्याला जमेल?

Ironman 70.3: मुख्यमंत्र्यांचे सचिव 'आयर्नमॅन', खडतर ट्रायथलॉनमध्ये मारली बाजी; संकेत आरसेकर यांनी पूर्ण केले तिहेरी आव्हान

SCROLL FOR NEXT