Section 354 IPC Goa Case Dainiak Gomantak
गोवा

Goa Crime: 'त्या' डॉक्टर महिलेला मिळाला न्याय! विनयभंग करणाऱ्या नराधमांना कोर्टचा दणका; दळवी, कांदोळकरांना ठोठावली कारावासाची शिक्षा

Section 354 IPC Goa Case: पर्वरी येथील एका प्रतिष्ठित महिला डॉक्टरला (मानसोपचारनतज्ज्ञ) मारहाण व विनयभंग प्रकरणी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: पर्वरी येथील एका प्रतिष्ठित महिला डॉक्टरला (मानसोपचारनतज्ज्ञ) मारहाण व विनयभंग प्रकरणी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने मुख्य आरोपी साल्वादोर द मुंद पंचायतीचे माजी सरपंच विजय दळवी आणि श्वेता कांदोळकर यांची शिक्षा काही प्रमाणात सुधारित केली असली, तरी त्यांचा मुख्य गुन्हा कायम ठेवत त्यांना कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

३० जुलै २०१७ रोजी पर्वरी येथील आपल्या जागेत रस्ता अडवल्याची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदार महिला डॉक्टर तिथे गेल्या होत्या. यावेळी आरोपींनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, मारहाण केली आणि त्यांना विवस्त्र करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात आरोपींनी सत्र न्यायालयात अपील केले होते. वैद्यकीय पुराव्यांमध्ये जखमा साध्या स्वरूपाच्या असल्याने आणि कोणत्याही घातक शस्त्राचा वापर न झाल्याने, दोघांचीही कलम ३२४ (घातक शस्त्राने मारहाण) मधून सुटका करण्यात आली आहे.

विजय दळवीला १ वर्षाचा कारावास

न्यायालयाने दळवी याला विनयभंग (कलम ३५४), महिलेचा अपमान (कलम ५०९), धमकी देणे (कलम ५०६-२) आणि हेतुपुरस्सर अपमान (कलम ५०४) या कलमांखाली दोषी धरले आहे. दळवीने तक्रारदाराला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करून गावासमोर विवस्त्र करण्याची धमकी दिली होती, हे सिद्ध झाले आहे. त्याला १ वर्षाचा साधा कारावास आणि ४ गुन्ह्यांसाठी प्रत्येकी २५ हजार याप्रमाणे एकूण १ लाख रुपये तक्रारदाराला भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.

श्वेता कांदोळकरला ६ महिन्यांचा कारावास

श्वेता कांदोळकरने तक्रारदाराच्या चेहऱ्यावर चिखल फेकला, त्यांना लाकडी ओंडक्यांवर ढकलले आणि त्यांचा मोबाईल फोडला होता. न्यायालयाने तिला मारहाण (कलम ३२३), धमकी आणि अपमानाबद्दल दोषी ठरवले. तिला ६ महिन्यांचा साधा कारावास आणि एकूण ७५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT