court Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: 4 वर्षांपासून कोठडीत, तरीही सुटका नाही; गिनीच्या ड्रग्ज तस्कराचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने ओढले ताशेरे

Guinea national Jerry Alex bail rejected: गिनी देशाचा नागरिक जेरी ऍलेक्स याचा जामीन अर्ज न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळून लावला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: कांदोळी परिसरातून व्यावसायिक प्रमाणात द्रव स्वरूपातील एलएसडी ड्रग्जसह अटक करण्यात आलेल्या गिनी देशाचा नागरिक जेरी ऍलेक्स याचा जामीन अर्ज न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळून लावला आहे. आरोपी गेल्या चार वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत असून, तो सराईत गुन्हेगार असल्याचे नमूद करत न्यायालयाने हा निर्णय दिला.

३० सप्टेंबर २०२१ रोजी अमली पदार्थ विरोधी पथक (एएनसी) आणि अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी) यांनी कांदोळी येथील एका घरावर छापा टाकला होता. या कारवाईत संशयित आरोपीकडे ४.१८ ग्रॅम द्रव एलएसडी जप्त करण्यात आले होते. हे प्रमाण ''व्यावसायिक'' श्रेणीत येत असल्याने एनसीबीने त्याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी), २२(सी) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून तो कोलवाळ येथील कारागृहात आहे.

आरोपीचे वकील ॲड. अश्विन दळवी यांनी युक्तीवाद केला की, संशयिताला वैयक्तिक वैमनस्यातून गोवण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि घरमालक यांनी तक्रारदाराला पाठिंबा दिलेला नाही. तसेच, आरोपीला अन्य एका एनडीपीएस गुन्ह्यात जामीन मिळाला असून तो सर्व अटींचे पालन करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली होती.

विशेष सरकारी वकील समीर तळेगावकर यांनी जामिनाला जोरदार विरोध केला. आरोपीवर यापूर्वीही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. तो व्यावसायिक व्हिसावर भारतात आला असला तरी त्याच्याकडे कोणताही ठोस व्यवसाय नाही. मुक्त केल्यास तो परदेशात पळून जाण्याची दाट शक्यता आहे, असे त्यांनी न्यायालयाच्या (Court) निदर्शनास आणून दिले.

गंभीर गुन्ह्याची नोंद!

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट केले की, एनडीपीएस कायद्याच्या कलम ३७ नुसार, व्यावसायिक प्रमाणातील अमली पदार्थ प्रकरणांमध्ये जामीन मिळवण्यासाठी कडक अटी आहेत. आरोपीवर आधीच एक गुन्हा प्रलंबित असल्याने तो 'सराईत गुन्हेगार' असल्याचे दिसून येते. केवळ प्रदीर्घ काळ कोठडीत आहे, या एकाच कारणावरून अशा गंभीर गुन्ह्यात जामीन देता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT