Goa Corona Updates: 27th December 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Updates: गोव्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ; 'इतके' नवे रूग्ण आढळले...

सक्रीय रूग्णसंख्येने ओलांडले अर्धशतक

Akshay Nirmale

Goa Corona Updates 27th December 2023: देशभरात ख्रिसमसचा उत्साह आणि नवीन वर्षाचे आगमन याबाबत उत्सुकता असतानाच कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच देशभरात कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरियंटचे रूग्ण आढळण्यास सुरवात झाली.

यात पहिल्या काही दिवसांत गोव्यात हे रूग्ण सर्वाधिक होते. त्यानंतर इतर राज्यांमध्येही या व्हेरियंटचे रूग्ण आढळून आले. आता, आज बुधवारी गोव्यात या रूग्णांची नवीन आकडेवारी समोर आली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाच्या एकूण 322 नवीन चाचण्या झाल्या होत्या. त्यातून नवीन 16 रूग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यातील सक्रीय रूग्णांची संख्या 52 वर पोहचली आहे.

नवीन आढळलेल्या 16 कोरोना रूग्णांपैकी 15 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर एकाला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 31765 कोरोनारूग्णांनी रूग्णालयात उपचार घेतले आहेत.

राज्यात आत्तापर्यंत 2 लाख 63 हजार 464 रूग्ण आढळले होते. 2 लाख 59 हजार 398 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा कोरोनामुक्तीचा दर 98.46 टक्के इतका आहे. राज्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत 4014 मृत्यू झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

माजी मुख्य न्यायमूर्ती रिबेलोंच्या निवेदनाचा अभ्यास करून पुढील निर्णय : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa Traffic Police: 'बेशिस्त' वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका! वर्षभरात 94 लाखांहून अधिक दंड वसूल; 5,025 जणांवर कारवाई

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT