Goa Corona Updates 28th December 2023:  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Updates: गोव्यात गेल्या 24 तासांत आणखी 13 कोरोना रूग्णांची भर, तर 4 रूग्ण कोरोनामुक्त

एकूण कोरोना रूग्णसंख्या 61 वर

Akshay Nirmale

Goa Corona Updates 28th December 2023: गोव्यात गुरूवारी 28 डिसेंबर रोजी कोरोनाचे नवीन 13 रूग्ण आढळून आले. राज्यातील एकूण सक्रिय कोरोना रूग्णसंख्या आता 61 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासात 4 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या गोव्यात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. यात देशविदेशातील पर्यटकांचा समावेश आहे. त्यातच आता कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरियंटचे रूग्ण आढळू लागले आहेत. त्यात गोवा हे देशातील एक हॉटस्पॉट ठरत आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण गोव्यात आढळले होते. आता कर्नाटक व इतर राज्यांतही कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत.

गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाच्या एकूण 273 नवीन चाचण्या झाल्या होत्या. त्यातून नवीन 13 रूग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यातील सक्रीय रूग्णांची संख्या 61 वर पोहचली आहे.

नवीन आढळलेल्या 16 कोरोना रूग्णांपैकी 11 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर 2 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यात आत्तापर्यंत 2 लाख 63 हजार 464 रूग्ण आढळले होते. 2 लाख 59 हजार 398 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा कोरोनामुक्तीचा दर 98.45 टक्के इतका आहे. राज्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत 4014 मृत्यू झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT