Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, आज शंभरहून अधिक रूग्ण, सक्रिय रूग्णसंख्येत मोठी वाढ

गेल्या आठवड्यापासून देशासह गोव्यातही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

Pramod Yadav

Goa Corona Update : गेल्या आठवड्यापासून देशासह गोव्यातही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गुरूवारी राज्यात सुमारे एका वर्षानंतर कोरोनाचा एक बळी गेला. राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे.

शुक्रवारी (दि.31) दिवसभरात राज्यात 120 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून, 55 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील सक्रिय रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

आरोग्य विभागाच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज दिवसभरात 986 नमुने तपासण्यात आले, त्यापैकी 120 नमुने सकारात्मक आले आहेत. राज्यात आजवर दोन लाख 59 हजार 933 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी दोन लाख 55 हजार 401 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट 98.26 टक्के एवढा आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज एकही कोरोनाबाधित रूग्ण दगावलेला नाही. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राज्यात 4014 रूग्ण दगावले आहेत.

 देशात सलग दुसऱ्या दिवशी तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

गुरुवारी देशात 3,095 कोरोना बाधितांची नोंद झाली. आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे.

गुरुवारी कोरोनामुळे गोवा-गुजरातमधील प्रत्येकी एक आणि केरळमधील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 5.30 लाख लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 2.61 टक्के नोंदवण्यात आला आहे. देशात कोरोनाचे एकूण 4.47 कोटी रुग्ण आहेत. देशात सध्याच्या घडीला 15,208 सक्रिय रुग्ण आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT