Corona Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update : राज्यात गेल्या 24 तासात 79 नवे कोरोनारूग्ण; जाणून घ्या सक्रीय रूग्णसंख्या...

दिवसभरात 7 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Corona Update: गोव्यात पुन्हा कोरोना संसर्गजन्य आजार हातपाय पसरत आहे. वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. रविवारी राज्यात नव्याने वाढ झालेले कोरोना बाधित रूग्ण 79 इतके आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने सायंकाळी राज्यातील कोरोना आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला.

अहवालानुसार, राज्यात रविवारी 636 नमुने तापासण्यात आले, त्यापैकी 79 सकारात्मक आले आहेत. तर, दिवसभरात 7 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज नव्याने कोणताही कोरोना रूग्ण दगावलेला नाही.

राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 98.22 टक्के एवढा आहे. सध्याच्या घडीला राज्यात 629 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आत्तापर्यंत 4014 मृत्यू झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 21 लाख 73 हजार 935 चाचण्या झाल्या असून त्यातून 2 लाख 61 हजार 574 कोरोनारूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 56 हजार 931 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

SCROLL FOR NEXT