Goa Covid Updates Dainik Gomantak
गोवा

गोवा राज्यात संक्रमण दर 12.76 टक्क्यांवर

नव्या सहा कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून संक्रमण दर 12.76 टक्क्यांवर पोहोचला आहे. आज उपचारासाठी सहा रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्याने कोरोनाची तीव्रता वाढली असल्याचे दिसून येते. या पार्श्‍वभूमीवर कोरोनासंबंधीच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे. (Goa corona News Update )

राज्यात आज कोरोनाचे नवे 156 रुग्ण सापडले असून सक्रिय रुग्णांची संख्या 866 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 47 हजार 520 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 42 हजार 821 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नसल्याने एकूण मृत्यूंचा आकडा 3 हजार 833 वर कायम आहे. बुधवारी 1,222 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी 156 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

21 जून रोजी संक्रमण आकडा 11.67 टक्क्यांवर होता

देशभर वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येसह गोवा राज्यातील कोरोना बाधितांची संख्याही झपाट्याने वाढत असून संक्रमण दर 21 जून रोजी 11.67 टक्क्यांवर पोहोचला होता. राज्य साथरोग तज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात मंगळवारी 21 जून रोजी कोरोनाचे नवे 135 रुग्ण सापडले होते. तर संक्रमणाचा दर 11.66 टक्क्यांवर पोचला होता. सक्रिय रुग्णांची संख्या 792 झाली होती. 21 जून रोजी पर्यंत 98.13 टक्के इतके आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नसल्याने एकूण मृत्यूचा आकडा 3 हजार 833 आहे. मंगळवारी 1157 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT