Minister Subhash Shirodkar  Dainik Gomantak
गोवा

Goa Cooperative Bank NPA Recovery: 'एनपीए'चे ओझे कमी करण्यासाठी सहकार खाते ॲक्शन मोडमध्ये! 65 लाखांची ‘एनपीए’ कर्जे वसूल; मंत्री शिरोडकरांची माहिती

Goa New Cooperative Policy Draft: सहकारी बँकांतील थकीत कर्जे वसूल करून एनपीएमध्‍ये (नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स) गेलेली खाती कमी करण्‍यासाठी सहकार खात्‍याने गेल्‍या काही महिन्‍यांत केलेल्‍या प्रयत्‍नांना यश मिळाले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सहकारी बँकांतील थकीत कर्जे वसूल करून एनपीएमध्‍ये (नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स) गेलेली खाती कमी करण्‍यासाठी सहकार खात्‍याने गेल्‍या काही महिन्‍यांत केलेल्‍या प्रयत्‍नांना यश मिळाले असून, गेल्या १५ महिन्यांत अशा १०५ खात्यांमधील रक्कम ६५ लाखांपर्यंत खाली आली आलेली आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

सहकार धोरणाच्‍या मसुद्याच्‍या अनावरणासाठी पर्वरी येथील मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी खासदार नरेंद्र सावईकर, सहकार निबंधक आशुतोष आपटे, ‘जीसीसीआय’च्‍या अध्‍यक्ष प्रतिमा धोंड आदी मान्‍यवर यावेळी उपस्‍थित होते.

‘सहकारी संस्‍थांकडून १ जानेवारी २०२५ पासून वितरित करण्‍यात आलेल्‍या कर्जांच्‍या वसुलीसाठी सहकार खात्‍याने वेगळा विभाग स्‍थापन केला. त्‍यावेळी १,०४१ कोटींची १९,७०६ खाती ‘एनपीए’मध्‍ये होती. परंतु, या विभागाने संबंधित संस्‍थांच्‍या संपर्कात राहून गेल्‍या १५ महिन्‍यांत १०५ खातेधारकांकडून ६५ लाखांच्‍या कर्जांची वसुली केलेली आहे. यापुढेही हे प्रयत्‍न सुरू राहतील. सहकारी सोसायट्यांतील कर्जे प्रलंबित राहण्‍यास संबंधित सोसायट्याही तितक्‍याच जबाबदार आहेत’, असे मंत्री शिरोडकर म्‍हणाले. ‘‘सहकार से समृद्धी या धोरणानुसार राज्‍यातील सहकार आणि स्‍वयंपूर्ण गोवा (Goa) चळवळ अधिक बळकट करण्‍याच्‍या दृष्‍टीने आमचे प्रयत्‍न सुरू आहेत.

सोबतच अधिकाधिक सोसायट्यांना ऑनलाईन पद्धतीने मान्‍यता देण्‍याचे कामही सुरू आहे. त्‍यामाध्‍यमातून गेल्‍या काही वर्षांत ६०८ सोसायट्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली आहे’, असेही त्‍यांनी नमूद केले. माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी सांगितले,की ‘सहकारी संस्‍थांमधील कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण, आर्थिकदृष्‍ट्या कमकुवत संस्‍थांना जवळच्‍या संस्‍थांकडून सहकार्य, व्‍यवहार पारदर्शकता, डिजिटलायझेशन यांसह सहकार लवादाच्‍या स्‍थापनेचा प्रस्‍ताव धोरणात आहे.

‘प्रशिक्षण, पारदर्शकता, लवादाला प्राधान्‍य’

सहकार धोरणाच्‍या अनावरणानंतर बोलताना, ‘राज्‍याच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच सहकार खात्‍याकडून अशापद्धतीचे धोरण जाहीर करण्‍यात येत आहे. हे धोरण बनवताना विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांची समिती स्‍थापन झाली होती. या समितीच्‍या एकूण सहा बैठका झाल्‍या. सोबतच राज्‍यातील ५,८०० सहकारी संस्‍थांच्‍या प्रमुखांशीही चर्चा करण्‍यात आली. या सर्वांच्‍या सूचनांचा विचार करून धोरण तयार करण्‍यात आले आहे’, असे माजी खासदार नरेंद्र सावईकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

Pandharpur Wari: वारकऱ्यांना सरकारकडून 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत; प्लास्टिकमुक्त वारीला द्या प्राधान्य- मुख्यमंत्री डॉ. सावंत

PF Withdrawal New Rule: नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफ खात्यातून ॲडव्हान्स काढण्याचे बदलले नियम; आता किती वेळा काढता येणार पैसे?

SCROLL FOR NEXT