
फोंडा: गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सरकारचे समर्थन लाभलेल्या पॅनलचा विजय झाला. या निवडणुकीत प्रकाश वेळीप यांचा पराभव झाला. भाजप आणि सरकारशी जवळीक असलेले १२ जण निवडून आल्याने त्यांचीच सत्ता बॅंकेवर असेल हे आज स्पष्ट झाले.
माजी संचालक मंडळाचे उपाध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर निवडून आले आहेत. माजी अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी निवडणूक लढवली नव्हती. कुर्टीकर व सहकाऱ्यांनी बाजी मारली आहे. या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक रविवारी १७ रोजी झाली होती. आज मंगळवारी १९ रोजी फोंड्यातील सहकार भवनात मतमोजणी पार पडली.
निवडून आलेले प्रतिनिधी खुल्या गटात पांडुरंग कुर्टीकर, सेवा सोसायट्या गटात विनायक नार्वेकर, विठ्ठलदास वेर्णेकर व कृष्णा कुडणेकर, ग्राहक संस्था गटात श्रीकांत नाईक. इतर गटात दादी नाईक, डेअरी गटात विजयकांत गावकर, अर्बन गटात श्रीपाद परब, पगारदार गटात उत्तर गोव्यात प्रिया टांगसाळी तर दक्षिण गोव्यात शाबा सावंत देसाई, महिला गटात चित्रा वायंगणकर व मैथिली परब तर एसटी-एससी गटात प्रभाकर गावकर यांची निवड झाली.
फोंड्यातील थ्रिफ्ट असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर यांच्या पॅनलला सर्वाधिक बारा जागा मिळाल्या. गोवा राज्य सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष असलेल्या पांडुरंग कुर्टीकर पॅनलला सरकारने पाठिंबा दिला होता, त्यामुळे गोवा राज्य सहकारी बँकेवर भाजप सरकारचे वर्चस्व सिद्ध झाले. त्यामुळे कुर्टीकर गटाचाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होणार आहे.
सहकार क्षेत्राशी निगडित असलेले माजी मंत्री तथा गोवा राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वेळीप यांचा गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष श्रीकांत नाईक यांनी पराभव केला. श्रीकांत नाईक यांना १६ तर प्रकाश वेळीप यांना ६ मते मिळाली. कन्झ्युमर गटासाठी ही निवडणूक झाली होती.
फोंड्यातील थ्रिफ्ट असोसिएशनचे तीन संचालक गोवा राज्य सहकारी बँकेवर निवडून आले आहेत. त्यात विद्यमान अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर, उपाध्यक्ष शाबा सावंत देसाई व संचालक प्रिया टांगसाळे यांचा समावेश आहे. थ्रिफ्टच्या सदस्यांमुळे साहजिकच कुर्टीकर गटाला सर्वाधिक मतदान झाले. थ्रिफ्टचे व्यवस्थापकीय संचालक साळू भगत यांचा त्यात मोठा वाटा आहे. भगत यांचे सदस्यांशी असलेले चांगले संबंध कामी आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सहकार क्षेत्रातील सर्वांच्या सहकार्यामुळे आणि बँकेच्या भागधारकांच्या प्रेमामुळे आपल्या पॅनलला हा विजय प्राप्त झाला असून तो ऐतिहासिक असा आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मुख्यमंत्री म्हणून असलेले कार्य व सहकार्य, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रात केलेली प्रगती यामुळे आम्हाला मताधिक्क्य मिळाले.
त्याचबरोबर इतरांचे सहकार्य मोलाचे ठरले. बँकेच्या उत्कर्षासाठीच आम्ही कार्य करू, असे गोवा राज्य सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर म्हणाले.फोंडा: गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सरकारचे समर्थन लाभलेल्या पॅनलचा विजय झाला. या निवडणुकीत प्रकाश वेळीप यांचा पराभव झाला. भाजप आणि सरकारशी जवळीक असलेले १२ जण निवडून आल्याने त्यांचीच सत्ता बॅंकेवर असेल हे आज स्पष्ट झाले.
माजी संचालक मंडळाचे उपाध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर निवडून आले आहेत. माजी अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी निवडणूक लढवली नव्हती. कुर्टीकर व सहकाऱ्यांनी बाजी मारली आहे. या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक रविवारी १७ रोजी झाली होती. आज मंगळवारी १९ रोजी फोंड्यातील सहकार भवनात मतमोजणी पार पडली.
निवडून आलेले प्रतिनिधी खुल्या गटात पांडुरंग कुर्टीकर, सेवा सोसायट्या गटात विनायक नार्वेकर, विठ्ठलदास वेर्णेकर व कृष्णा कुडणेकर, ग्राहक संस्था गटात श्रीकांत नाईक. इतर गटात दादी नाईक, डेअरी गटात विजयकांत गावकर, अर्बन गटात श्रीपाद परब,
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.