Goa Mpt Container  Dainik Gomantak
गोवा

Goa Container ship service: मुरगाव बंदराचे सर्व शुल्क माफ

एमपीटीकडून जहाजचालकांना सवलत, स्‍थानिक उद्योग आणि निर्मितीच्‍या गरजांना प्राधान्‍य

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील कंटेनर सेवा (Goa Container ship service) बुधवारपासून अचानक एकतर्फी बंद झाल्याने राज्यातील उद्योजक अडचणीत आले. त्याची केंद्रीय बंदर विकासमंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी तातडीने दखल घेतली असून या कंटेनर सेवेसाठी मुरगाव (Mormugao) बंदराचे सर्व शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दै. गोमन्तक’शी बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले, की सरकारने चर्चा चालू केलेली असतानाही मुरगाव बंदरात येणारे कंटेनर जहाज बंद करण्याचा निर्णय एकतर्फी आहे आणि त्या खासगी जहाज कंपनीच्या विरोधात सरकार कारवाई करणार आहे. (Goa Container ship service: All charges of Mormugao Port waived)

मुरगाव बंदराच्या अध्यक्षपदाचा ताबा सध्या मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष आएएस राजीव जलोटा यांच्याकडे असून त्यांना तातडीने गोव्यात बोलाविण्यात आले. त्यांच्याशी चर्चा करूनच कंटेनर सेवेसाठीचे सर्व शुल्क माफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुरगाव बंदरात अधिक सोयी निर्माण करण्यासंदर्भात आपली कॅबिनेट मंत्री आणि जहाज बांधणी मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी बोलणी यशस्वी ठरली.

एमपीटीकडून जहाजचालकांना सवलत

कंटेनर फिडर सेवा सुरू करण्यास इच्छुक असलेल्या नवीन जहाजचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमपीटीने सवलत जाहीर केली आहे. एमपीटी ट्रॅफिक मॅनेजर कॅप्टन हिमांशू शेखर यांनी नवीन कंटेनर फिडर ऑपरेटरसाठी व्हीआरएस शुल्कामध्ये सूट देणारी व्यापार सुविधांविषयी नोटीस जारी केली. एमपीटी गोव्यापासून प्रस्तावित कोणत्याही नवीन कंटेनर फिडर सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या फेरीसाठी व्हीआरसीची 100 टक्के सवलत (पायलट, पोर्ट ड्यूज आणि बर्थ हायर), दुसऱ्या फेरीसाठी पोर्ट नवीन कंटेनर फिडर ऑपरेटरला विद्यमान बर्थिंग विंडो सुविधा देईल.

1) नवीन कंटेनर ऑपरेटर फिडर जहाजाला पुढील पुनर्विलोकन होईपर्यंत व्हीआरसीवर 50टक्के सवलत दिली जाईल. पहिल्या तीन महिन्यांसाठी विशेष सवलत म्हणून ( मासेमारी निर्यात हंगामाचा आढावा घेण्यासाठी ज्याचा आढावा घेतला जाईल, 24 तासांच्या नोटीसवर (48 तासांऐवजी) कंटेनर वाहिनीला प्राधान्य दिले जाईल आणि सुविधेचा लाभ न घेतलेल्या कंटेनर जहाजांना 50 टक्के सवलत दिली जाईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.

2) एमएससी इंडिया गोव्यात आपल्या कंटेनरसाठी जहाज सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. सर्व भागधारकांशी चर्चा केल्यावर आणि त्यातील अडचणी लक्षात घेऊन फीडर ऑपरेटर आणि कंटेनर एजंट्ससाठी, अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. घोषित केलेल्या सवलतींमुळे कंटेनर सेवा सुसंगत आणि टिकाऊ होईल.

3) नियमित आणि टिकाऊ कंटेनर सेवेची हमी देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ऑपरेटरला अधिकाधिक सुरळीत सेवा देणे. त्यामुळे कोणतीही कंटेनर लाईन किंवा जहाज ऑपरेटर कंटेनर व्यापारासाठी गोव्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही आणि अचानक सेवा बंदही करू शकणार नाहीत. एमपीटीचे व्यवस्थापन आणि विश्वस्त मंडळ व्यापाराच्या गरजा, विशेषत: स्थानिक उद्योग आणि निर्मितीच्या गरजांना प्राधान्य देईल. स्थानिक उद्योगदेखील एमपीटीला संरक्षण देईल असे अपेक्षित आहे.

गोव्यातील उद्योजकांबद्दल आत्मीयता : नाईक

केंद्र सरकार गोव्यातील उद्योजकांसाठी बंदरात सर्व सोयी उपलब्ध करून देणार आहेत. गोव्यातील निर्यातप्रधान उद्योजकांना कोणत्याही स्थितीत अडचण होऊ नये अशी केंद्र सरकारची भू्मिका आहे. मला स्वतःला गोव्यातील उद्योजकांबद्दल आत्मीयता आहे आणि मी वयक्तिक पातळीवर त्यांना मदत करण्यासाठी सर्व प्रयत्न करतो आहे.

राज्यातील उद्योजकांना मदतरूपी ठरेल अशा किमान दोन कंटेनर वाहतूकदार जहाज कंपन्यांशी सरकारची बोलणी सुरू आहेत. मला खात्री आहे, लवकरात लवकर ते आपली सेवा सुरू करतील. त्यांना बंदराकडून कोणतीही अडचण होणार नाही यावर माझा कटाक्ष असेल. बंदरात आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा उभारण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कंटेनरांची चढउतार वेगाने होऊ शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT