Mapusa : National Highways contractor to construct the bridge without removing soil and stones along with waste construction materials from the Tar river. Dainik Gomantak
गोवा

Goa : तार नदीवरील पुलाचे बांधकाम रोखले

आश्‍वासन न पाळता कंत्राटदाराची बांधकामाची घाई : नगराध्‍यक्षांसह स्‍थानिकही एकवटले

Mahesh Tandel, Tushar Tople

म्हापसा : राष्ट्रीय महामार्गाचे (National Highway) बांधकाम करत असताना तार नदीवर पूल (River Bridge) बांधण्याच्या (construction) कामाला कंत्राटदाराने (contractor) सुरू केले. पण, तार नदीतील बांधकामाचे अनावश्‍‍यक साहित्य, (waste building materials) पाईप, लोखंडाच्या सळ्या व इतर साहित्य तार नदीतून न काढता पुलाचे थेट बांधकाम सुरू केले. त्‍यामुळे गावसवाडा येथील ग्रामस्‍थांसह नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर व नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी हे काम दुसऱ्यांदा बंद पाडले. सर्वप्रथम नदीतील टाकावू साहित्‍य काढा, त्‍यानंतरच बांधकाम सुरू करा, अशी आग्रही भूमिका पालिका व ग्रामस्‍थांनी घेतली.

तार नदीवरील पुलाच्या बांधकामाची चाहूल लागताच स्थानिकांनी या कामाकडे लक्ष केंद्रीत केले. नगरसेवक तारक आरोलकर यांनी नदीतील बांधकाम टाकावू साहित्य, माती व इतर टाकावू साहित्य काढण्याचा आग्रह धरला व काम बंद पाडले होते. काम बंद पाडल्यानंतर कंत्राटदार राव यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत, आमदार ग्लेन टिकलो व आमदार ज्यो‍शुआ डिसोझा यांची भेट घेऊन काम चालू करण्यासाठी आशीर्वाद मागितले. २४ तासांच्या आत या दोन आमदारांनी हस्तक्षेप करून त्‍या नगरसेवकांना काम बंद करण्यास हरकत घेऊ नका, कंत्राटदाराला काम बंद राहिल्यास दररोज लाखो रुपयांचे नुकसान होईल. कंत्राटदार तार नदीतील टाकावू साहित्य काढून देईल, असे आश्‍वासन आमदारांनी दिल्यामुळे नगरसेवकांची तलवार म्‍यान केली होती.

कंत्राटदाराकडून दिशाभूल?
आमदार ग्‍लेन टिकलो यांनी बस्तोडा पंचायतीमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राटदार राव यांचे अभियंते व बस्तोडा सरपंच रणजीत उजगावकर व पालिका नगरसेवक प्रकाश भिवशेट यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी तार नदीतील टाकावू साहित्य तसेच पूर्वीच्या पाईप पुलासाठी घातलेले काँक्रिट व लोखंडी सळ्यांचा पाया तोडून, तसेच नदी किमान दीड मीटर खोदून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंत्राटदाराने लेखी आश्‍वासन देऊन २० दिवसांत काम करून देण्याची हमी या बैठकीत दिल्यामुळे काम सुरू करण्यास परवानगी दिली. पण, कंत्राटदाराने राजकीय आशीर्वादाने या लेखी आश्‍वासनाला कचऱ्याची टोपली दाखवली व पुलाचे काम पुन्हा युद्धपातळीवर चालू ठेवले. त्‍यामुळे नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर व नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी काल संध्याकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराचा अभियंता श्री. काली यांना बोलावून या प्रकारासंदर्भात जाब विचारला होता. कंत्राटदाराच्या अभियंता विभागाने सांगितले, मुसळधार पावसामुळे आम्ही पुलाच्या एका बाजूने असलेला टाकावू साहित्‍य काढता आले नाही. आम्हाला पुलावरील स्लॅब घालण्यात द्यावा. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नदीतील टाकावू साहित्य काढण्यात येईल, असे सांगितले. पण, नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी सर्वप्रथम नदीतील टाकावू साहित्य काढा, असा आग्रह धरला व शेवटी कंत्राटदाराचा अभियंता श्री. काली यांनी काम बंद ठेवण्याचा शब्द दिला.

तार नदीतील टाकावू साहित्य काढल्यानंतर आम्ही पुलावरील स्लॅब घालण्यास परवानगी देणार आहोत. पुलाच्या एका बाजूला असलेला टाकावू साहित्य मशीनद्वारे काढले आहे. पण, दुसऱ्या बाजूला असलेले बांधकाम टाकावू साहित्य काढले नाही. मुसळधार पावसामुळे नदीला भरती आहे. त्यामुळे मशीनद्वारे टाकावू साहित्य काढता येत नाही. आम्ही पाऊस कमी झाल्यानंतर कामगारांकडून बांधकाम साहित्य काढण्याचे आश्‍वासन कंत्राटदाराने दिले आहे. जोपर्यंत नदीतील टाकावू साहित्य काढत नाही, तोपर्यंत पुलावर स्लॅब घालण्यास आम्ही देणार नाही.
- शुभांगी वायंगाणकर, नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

Curlies Restaurant Sealed : मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

SCROLL FOR NEXT