Alka Lamba  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गोव्यात काँग्रेसचा महिला अजेंडा; सर्व 40 जागांवार 40 महिला उमेदवार देण्याची तयारी; अलका लांबांची माहिती

Goa Assembly Elections 2027: राज्यात आतापासूनच 2027 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत.

Manish Jadhav

Goa Assembly Elections 2027 Congress Prepares with 40 Women Leaders

राज्यात आतापासूनच 2027 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा आज (22 मार्च) गोवा दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी लांबा यांनी पत्रकार परिषद घेवून डिसेंबर महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह 2027 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या तयारीवर प्रकाश टाकला.

काय म्हणाल्या अलका लांबा?

लांबा म्हणाल्या की, ''स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के महिलांना संधी दिली जाणार आहे. विधानसभेला 2027 मध्ये गोव्यातही 33 टक्के महिलांना राजकीय आरक्षण देण्यारसठी दबाव आणला जाईल. आम्ही 40 महिला नेत्यांसह सर्व 40 विधानसभा जागांसह तयारी करत आहोत, कोण निवडणूक लढावू शकते आणि जिंकू शकते याची चाचपणी केली जात आहे.''

महिलांसाठी 33 टक्के राजकीय आरक्षण

लांबा पुढे म्हणाल्या की, 'केंद्र सरकारने देशभरात 33 टक्के महिलांना राजकीय आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केले, पण ते विधेयक लागू करण्यासाठी काँग्रेस पक्षाने संसदीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिल्लीत आंदोलन केले. देशभर विविध राज्यांत काँग्रेस पक्षातर्फे महिलांच्या राजकीय आरक्षणासाठी आंदोलन केले जाणार आहे. त्याशिवाय, गोव्यातही महिला काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री आणि विधानसभेवर घेराव आंदोलन करण्यात येईल.'

गोव्यात महिलांवर अत्याचार वाढले

लांबा शेवटी म्हणाल्या की, 'गोव्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. हे सरकार महिलांना सुरक्षितता देण्यात अपयशी ठरली आहे. त्याचा परिणाम केवळ स्थानिक महिलांवरच नाही तर पर्यटक म्हणून आलेल्या परदेशातील महिलांवरही झाला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT