Goa Congress President Shri Amit Patkar & South Goa MP Capt Viriato Fernandes Meet Shri Prakash Ambedkar Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे काँग्रेस खासदार विरियातो फर्नांडिस, अध्यक्ष पाटकरांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

Goa Politics: सामाजिक न्याय, समता आणि लोकशाहीच्या तत्त्वांना धोका निर्माण करणाऱ्या आव्हानांवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Pramod Yadav

मुंबई: गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. देश आणि राज्यातील राजकीय परिस्थिती आणि हालचालींवर यावेळी आंबेडकरांशी चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे.

पाटकर आणि फर्नांडिस यांच्यासोबत यावेळी नेते नितीन चोपडेकर देखील उपस्थित होते. डॉ. बाबसाहेब आंबेडकर कायम ज्यासाठी उभे राहिले अशा सामाजिक न्याय, समता आणि लोकशाहीच्या तत्त्वांना धोका निर्माण करणाऱ्या आव्हानांवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रकाश आंबेडकरांनी सध्याची राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, उपेक्षित समुदायांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करण्याची तातडीची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. या बैठकीत सर्वसमावेशक विकासाचे महत्त्व आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या, विशेषत: वंचितांच्या प्रगतीसाठी प्राधान्य देणारी धोरणे अधोरेखित करण्यात आली, अशी माहिती काँग्रेसने दिली.

खासदार फर्नांडिस, अमित पाटकरांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पण, काँग्रेसने ही भेट राजकीय नसल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शहांनी राज्यसभेत संविधानावर चर्चा सुरु असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वक्तव्य केले होते. शहांच्या वक्तव्यावरुन देशभरात राजकीय पक्ष आणि भीम सैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गोव्यात देखील काँग्रेसने आंदोलन करत निदर्शने केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Repair: 'नोव्हेंबर अखेरपर्यंत गोव्यातील रस्ते उत्तम स्थितीत', मंत्री कामतांनी दिली ग्वाही; रस्ता खोदणाऱ्यांसाठी दिला इशारा

Exam Paper Issue: 3रीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ! विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसल्याचा दावा; पालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

‘ही अतिशय दुर्दैवी स्थिती', सेवानिवृत्तांना मुदतवाढ देण्याच्या प्रथेबद्दल कोर्टाचे ताशेरे; यंत्रणेचे मनोबल खच्ची केल्याचा ठपका

Lotulim Shipyard Blast: लोटली येथे शिपयार्डमध्ये आगीमुळे मोठा स्फोट; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू; 4 जखमी

Yusuf Pathan Post Controversy: 'आदिनाथ मंदिर की आदिना मशीद'? युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा आक्षेप; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

SCROLL FOR NEXT