Goa Congress Gomantak Digital Team
गोवा

Goa Congress: लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने फोंडा गट काँग्रेसच्या हालचाली सुरु; समित्या नियुक्तीसह...

फोंडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress फोंडा गट काँग्रेस समितीची बैठक येथील कार्यालयात गट समितीचे अध्यक्ष विलियम आगियार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी फोंड्याचे काँग्रेस नेते राजेश वेरेकर उपस्थित होते. पालिका निवडणुकीतील कार्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

फोंडा मतदारसंघात बूथ समित्या नियुक्त करून काँग्रेसच्या कार्याला परत एकदा चालना देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

फोंडा मतदारसंघातून दक्षिण गोव्यातील काँग्रेस उमेदवाराला जास्तीत जास्त आघाडी मिळवून देण्याकरता कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आव्हान वेरेकर यांनी केले.

यावेळी अरुण गुडेकर, मिंगेल फर्नांडिस, प्रशिल शेट पारकर, डायगो डिसोझा, नारायण नाईक, सायमन आगियार, फ्रान्सिस फर्नांडिस आदींनी विविध सूचना केल्या. सुरवातीला गटाध्यक्ष आगियार यांनी स्वागत केले, शेर्ली डायस यांनी सूत्रसंचालन केले, तर सलीम बडेसाब यांनी आभार मानले.

काँग्रेसला पूरक वातावरण : वेरेकर

बेरोजगारी, महागाई यामुळे त्रस्त झालेले नागरिक भाजप राजवटीला कंटाळले असून काँग्रेसला पूरक वातावरण निर्माण झाले असल्याचे काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांनी सांगितले.

फोंडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जात होता आणि आता परत एकदा ही बाब सिद्ध करण्याची वेळ आली आहे. कार्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आव्हान त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अंमली पदार्थांच्या काळ्या पैशावर ED आणि NCB ची सर्जिकल स्ट्राईक! गोव्यासह 7 राज्यांतील 25 ठिकाणी छापेमारी; कोट्यवधींची रोकड जप्त

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येला ग्रहांचा राजा आणि मनाचा स्वामी एकत्र, 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; उजळणार नशीब

Goa Crime: चोरीसाठी महिलेच्या जिवावर उठला चोर! थरारक घटनेनंतर मडगाव पोलिसांची मोठी कारवाई; संशयिताच्या आवळल्या मुसक्या

Arambol Crime: हरमल हादरले! हात बांधले, धारदार शस्त्राने केला मानेवर वार; खूनप्रकरणी संशयित रशियन आरोपीला अटक

Bangladesh Violence: बांगलादेशात इस्लामिक कट्टरपंथीयांचं पाशवी कृत्य! हिंदू कुटुंबावर हल्ला करुन घर दिलं पेटवून; जीव वाचवण्यासाठी धडपड VIDEO

SCROLL FOR NEXT