Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेसचे 'तिकीट' विक्रीसाठी? नुवेच्या उमेदवारीवरून भाजपचा थेट सवाल; कार्यालयाच्या जागेच्या व्यवहाराबाबत मागितला खुलासा

Goa Congress Panaji Office Deal,: काँग्रेस पक्षाने पणजीतील कार्यालयीन जागा खरेदी करण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकासोबत करार केला असून त्यासाठी टोकन रक्कमही दिल्याची माहिती सार्वजनिक क्षेत्रात चर्चेत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: काँग्रेस पक्षाने पणजीतील कार्यालयीन जागा खरेदी करण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकासोबत करार केला असून त्यासाठी टोकन रक्कमही दिल्याची माहिती सार्वजनिक क्षेत्रात चर्चेत आहे. या व्यवहारातील उर्वरित रक्कम भरण्यासाठी नुवे मतदारसंघातील उमेदवारी आर्थिक निकषांवर देण्याचा विचार सुरू असल्याच्या चर्चाही पुढे आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गोमंतकीय जनतेसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी केली आहे.नाईक यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. उमेदवारी ही पक्षनिष्ठा, जनसेवा, कार्यकर्त्यांचे योगदान आणि जनतेचा विश्वास या आधारावर ठरली पाहिजे. पैशांच्या जोरावर उमेदवारी देणे लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना धरून नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

नुवे मतदारसंघातील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते तसेच वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून आर्थिकदृष्ट्या सक्षम इच्छुकांना प्राधान्य दिले जात असल्याच्या चर्चांमुळे काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा दावा भाजपने केला आहे.पक्षाच्या कार्यालयासाठी जागा खरेदी करण्याच्या व्यवहाराचा आणि निवडणूक उमेदवारीचा परस्पर संबंध आहे का, याबाबत काँग्रेसने स्पष्टता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राजकारणाचे व्यापारीकरण होत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

भाजपचे काँग्रेसला चार प्रश्‍न

भाजपने काँग्रेस नेतृत्वासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पणजीतील कार्यालयीन जागा खरेदीसाठी कोणता करार करण्यात आला आहे का? या व्यवहारासाठी किती रक्कम देणे बाकी आहे? नुवे किंवा अन्य कोणत्याही मतदारसंघातील उमेदवारी आर्थिक योगदानाशी जोडण्यात आली आहे का? आणि पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून धनाढ्य इच्छुकांना प्राधान्य दिले जात आहे का? याचे उत्तर काँग्रेसने जनतेला द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT