Goa Congress observes 'Black Day' In Margao Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: एकाही फुटिराला माफी नाही : अमित पाटकर

काँग्रेसकडून काळा दिन; जनताच उत्तर देईल

दैनिक गोमन्तक

देवाची शपथ घेऊनही नंतर ती शपथ विसरून काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केलेल्‍या ‘त्‍या’ आठ आमदारांनी फक्‍त काँग्रेस आणि देवालाच फसविले नाही तर त्‍यांना ज्‍या मतदारांनी मोठा विश्‍वास दाखवून निवडून आणले होते, त्‍यांच्‍याशीही प्रतारणा केली.

या गद्दारांना मतदार माफ करणार नाहीत. येत्‍या निवडणुकीत त्‍यांना मतदार योग्‍य तो धडा शिकवतील, असे काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

या फुटीला 14 सप्‍टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्‍याने काँग्रेसतर्फे गुरुवारी ‘काळा दिन’ पाळण्‍यात आला. जे आठ आमदार फुटले होते, त्‍यांच्‍या प्रतिमांचे दहन करण्‍यात आले.

मागच्‍या एक वर्षात मडगाव मतदारसंघात काँग्रेसने आपली गटसमिती का स्‍थापन केली नाही असे विचारले असता, आधी आम्‍ही कार्यालय सुरू करू आणि मग सर्व गोष्‍टी जागेवर घालू, असे पाटकर म्‍हणाले.

काळे कपडे केले परिधान

महिला काँग्रेसच्‍या अध्‍यक्ष बीना नाईक, काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्‍हाध्‍यक्ष सावियो डिसिल्‍वा आणि अन्‍य पदाधिकारी उपस्‍थित होते. त्‍यापूर्वी जिल्‍हा कार्यालयाकडून एक विशेष फेरी काढण्‍यात आली. यावेळी कित्‍येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान केले होते.

"मडगाव मतदारसंघात पुन्‍हा काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी उभारू. 2 ऑक्‍टोबरपूर्वी मडगावात काँग्रेस पक्षाचे स्‍वत:चे कार्यालय उभारण्‍यात येईल. लोकसभा निवडणुकीत मडगाव मतदारसंघातून काँग्रेसला आघाडी मिळवून देण्‍याचा आमचा प्रयत्‍न असेल."

- अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोर्तुगीज फुटबॉलपटूसोबत सेल्फीचा मोह भोवला, केरळच्या फॅनला गोव्यात तुरुंगात काढावी लागली रात्र; FC Goa ला होऊ शकतो 8 लाखांचा दंड

Narkasur: श्रीकृष्णाऐवजी 'नरकासुराचाच' उदो उदो का होतोय?

Prashanti Talpankar: गोव्याच्या 'प्रशांती'ची भरारी! IFFSA टोरंटो येथे ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, Video

Kelbai Goddess Statue: अद्भुत! पर्येतील वाळवंटी नदीत आढळली 'केळबाय देवी'ची कदंब राजवटीतील पुरातन मूर्ती

Goa School: गोवा शिक्षण खात्याचा अजब कारभार! सरकारी शाळा दिली कर्नाटकमधील मठाला, कातुर्ली-तुयेतील प्रकार

SCROLL FOR NEXT