Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar: 'होय, लोकसभेसाठी मी अर्ज केला पण...' काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांचे महत्वाचे स्पष्टीकरण

Girish Chodankar: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस उमेदवारीविषयी चोडणकर यांनी आपली भूमिका मांडली.

गोमन्तक डिजिटल टीम

Girish Chodankar: दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार म्हणून मी अर्ज केला आहे. परंतु, तेथे अल्पसंख्याक उमेदवाराचे नाव विचारात असेल तर आपली त्यासाठी काहीही अडकाठी असणार नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस उमेदवारीविषयी चोडणकर यांनी आपली भूमिका मांडली. काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चोडणकर म्हणाले, गत निवडणुकीत पक्षाने आपणास लढण्याची सूचना केली, त्यामुळे आपण मैदानात उतरलो आहे. तत्पूर्वी 2017 मध्ये पोटनिवडणूक लागल्याने मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात काँग्रेसने दोन उमेदवार तयार ठेवले होते, परंतु त्यावेळी ऐनवेळी आपल्याला उमेदवारी स्वीकारून रिंगणात उतरवावे लागले.

उत्तर गोव्यातून काही नावे:-

उत्तर गोव्यात पक्षाकडे ॲड. रमाकांत खलप, विजय भिके, राजन घाटे आणि संजय बर्डे यांच्यासारखे उमेदवार आहेत, त्यांची नावे यादीत आहेत आणि हे चांगले उमेदवार आहेत. आपण उत्तर गोवा लोकसभेच्या उमेदवारीचा विचार केलेला नाही.

दक्षिणेतून आपण उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज दिला आहे. मात्र, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ अल्पसंख्यांक उमेदवाराच्या मागे राहणारा आहे, त्यामुळे त्याठिकाणी अल्पसंख्यांक उमेदवार देण्याचा विचार झाल्यास आपली काहीही हरकत राहणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT