Ketan Bhatikar Pass Away Dainik Gomantak
गोवा

Ketan Bhatikar Pass Away: जनसेवक हरपला, गोवा हळहळला! केतन भाटीकरांचा सर्पदंशानं मृत्यू, आमदारकीचं स्वप्न राहिलं अधुरं; पण, अखेरपर्यंत केली समाजसेवा

Congress leader Ketan Bhatikar: फोंडा येथील समाजसेवक तथा काँग्रेसचे नेते डॉ. केतन भाटीकर (41) यांचे शुक्रवारी (15 मे) पहाटे अकस्मात निधन झाले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: फोंडा येथील समाजसेवक तथा काँग्रेसचे नेते डॉ. केतन भाटीकर (41) यांचे शुक्रवारी (15 मे) पहाटे अकस्मात निधन झाले. सर्पदंशाने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. फोंडा मतदारसंघात आपल्या कार्याची अविट छाप पाडणाऱ्या तरुण व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने सारा गोवा हळहळला.

भाटीकरांचा सर्पदंशाने मत्यू

उपलब्ध माहितीनुसार, डॉ. भाटीकर व त्यांचा एक मित्र गुरुवारी उत्तररात्री दांडेलीहून गोव्यात येत होते. अनमोड घाटात लघुशंकेसाठी कार उभी करण्यात आली. तेव्हा भाटीकर खाली उतरले असता त्यांच्याकडील मोबाईल रस्त्यावर पडला. तो उचलताना त्यांच्या हाताला सर्पदंश झाला, त्यांना तत्काळ धारबांदोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेव्हा कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी समाज माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, डॉ. भाटीकर यांना पहाटे 3.32 वाजण्याच्या सुमारास 108 रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य केंद्रात आणण्यात आले. रुग्णालयात (Hospital) आणले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले; मात्र प्रयत्न निष्फळ ठरले.

कुळे पोलिसांना माहिती

पहाटे 3.45 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी या संदर्भात कुळे पोलिसांना माहिती दिली. मृतदेह विच्छेदनासाठी मडगाव येथे पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या मते, डॉ. भाटीकर यांच्या पायावर किरकोळ खरचटल्याच्या खुणा आढळल्या; मात्र कोणत्याही मोठ्या जखमा दिसून आल्या नाहीत. त्यांच्या ओठांचा रंग निळसर झाल्याचेही सांगण्यात आले. प्राथमिक निरीक्षणानुसार, सर्पदंशाची शक्यता व्यक्त करण्यात आली; मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असेही डॉक्टरांनी सांगितले. 108 रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, भाटीकर यांना मोले येथील जैवविविधता उद्यान परिसरातून उचलण्यात आले.

कोविड वॉरियर

डॉ. भाटीकर यांनी 2017 पासून 80हून अधिक रक्तदान शिबिरे घेतली. रायझिंग फोंडा'च्या माध्यमातून त्यांनी सातत्याने समाजकार्य केले. कुणीही कधीही मदतीसाठी फोन लावावा, डॉ. भाटीकर हे सदैव तत्पर असत. कोरोनाच्या काळात त्यांनी प्रचंड जनसेवा केली. फोंडा उपजिल्हा रुग्णालय सुधारणेसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले. फोंडा (Ponda) भागात अग्निशमन दलाच्या तोडीस तोड त्यांनी आपत्ती निवारणार्थ काम केले. युवकांमध्ये जनजागृती, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि समाजोपयोगी उपक्रमांमुळे त्यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

आमदारकीचे स्वप्न अधुरे; पण, अखेरपर्यंत समाजसेवा!

डॉ. केतन भाटीकर हे केवळ एक नामांकित फिजिओथेरपिस्ट किंवा राजकीय नेते नव्हते तर ते समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आधारवड ठरले होते. लोकांच्या वेदनांवर फुंकर घालणारे, त्यांच्या डोळ्यांतील भीती दूर करणारे आणि नवजीवनाची उमेद देणारे संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. आमदार होणे हे त्यांचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले नसले तरी अखेरपर्यंत त्यांनी जनसेवा केली.

2015 गोवा विधानसभा निवाणूक त्यांनी पणजी मतदारसंघातून 'गोवा सुरक्षा मंच' तर्फे लढवली होती. तर 2022 मध्ये ते फोंडा मतदारसंघातून 'मगोप'तर्फे लढले होते. त्यात अत्यंत कमी मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. 2026 मध्ये फोंडा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती; मात्र न्यायालयीन आदेशामुळे ही पोटनिवडणू‌क रद झाली.

डॉ.. केतन भाटीकर आपल्यात नाहीत, हे वास्तव पचवणे अवघड आहे. अजूनही विश्वास बसत नाही. जे काही घडले ते धक्कादायक आहे. ते कार्यरुपी अमर राहतील.

- राजेश वेरेकर, काँग्रेस नेते

डॉ. भाटीकर यांचा मृत्यू धक्कादायक आहे. समाजासाठी त्यांचे योगदान कालातीत आहे. समस्त गोमंतकीयांना हा धक्का आहे.

- गोवा प्रदेश काँग्रेस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

Goa Eco-Friendly Ganesha: मूर्तीकारांसाठी सावंत सरकारची मोठी घोषणा! आता प्रत्येक मातीच्या मूर्तीवर मिळणार 'इतके' अनुदान; पर्यावरण संरक्षणाचा नवा पॅटर्न

Goa Shack Policy 2026: गोव्यात सुधारित 'शॅक धोरण' लागू! समुद्रकिनाऱ्यावर डेक-बेड्स, छत्र्या ठेवण्यासाठी पर्यटन खात्याने मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT