Goa Congress Committee Will be protesting against Price rise of Gas, Diesel Petrol  Dainik Gomantak
गोवा

दुसऱ्या दिवशी ही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, काँग्रेस आक्रमक

डिझेल पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन

दैनिक गोमन्तक

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती चार महिन्यांत पहिल्यांदाच मंगळवारी वाढल्या. सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.21 रुपये प्रतिलिटर आहे तर डिझेल 87.47 रुपये प्रतिलिटर आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने तेल कंपन्यांनी तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. दरम्यान, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीसह काँग्रेस (Congress) आमदार, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल यांनी एनएसयूआय गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले आहे. उत्तर गोव्याच्या (goa) जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देखील आज दिले गेले आहे.

इंधनाच्या किमती किती वाढण्याची शक्यता आहे?

तेलाचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांना त्यांचे मार्केटिंग मार्जिन राखता यावे यासाठी कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल 1 डॉलरच्या वाढीमागे पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) या दोन्हींच्या किमती 0.52 रुपयांनी वाढवणे आवश्यक आहे. कच्च्या तेलाच्या उच्च किमतीचा ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी केंद्र पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करू शकते, असा अंदाज आहे. पेट्रोलवरील सेंट्रल उत्पादन शुल्क अजूनही कोरोना (Corona) महामारीपूर्वीच्या वेळेपेक्षा 8 रुपये जास्त आहे, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क महामारीपूर्वीच्या वेळेपेक्षा 6 रुपये जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: पाकिस्तानी अंपायरचा तो 'अजब' निर्णय! ऑस्ट्रेलियन खेळाडूही चक्रावले, नेटकरी म्हणाले, "अशा अडाणी लोकांना अंपायर कोणी केलं?"

Video: "हटो हटो, डोन्ट डिस्टर्ब चेट्टा"! कॅप्टन सूर्याचा धमाल व्हिडीओ; नेटवर घालतोय धुमाकूळ

Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

Kurdi: 1882 साली सोमेश्वराची घटना पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे! साळावली धरणाच्या जलाशयाखाली बुडालेले 'कुर्डी' गाव

Bengaluru Airport Bomb Threat: "माझ्याकडे दोन बॉम्ब आहेत", बंगळुरु विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा; इंडिगो प्रवाशाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT