Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: चोडणकरांनी स्वीकारला पदभार; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह

Girish Chodankar takes charge Goa Congress: काँग्रेस पक्षातून दोनवेळा आमदार फुटीचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे आमदार फुटीचा प्रकार २०२७ मध्ये घडू नये, यासाठी विधानसभा निवडणुकांमध्ये २१ आमदार निवडून आणणे महत्त्वाचे आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: काँग्रेस पक्षातून दोनवेळा आमदार फुटीचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे आमदार फुटीचा प्रकार २०२७ मध्ये घडू नये, यासाठी विधानसभा निवडणुकांमध्ये २१ आमदार निवडून आणणे महत्त्वाचे आहे. बहुमताने सरकार स्थापन झाल्यास पक्षांतर होणार नाही, असा विश्वास प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला, त्याचबरोबर आपली सर्वोच्च न्यायालयात पक्षांतराविरोधात याचिका आहे आणि तिचा निकाल लवकरच लागेल, अशीही पुष्टी त्यांनी जोडली.

काँग्रेस भवनात शनिवारी प्रदेशाध्यक्ष म्हणून चोडणकर यांनी पदभार स्वीकारला. गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच नव्याने नियुक्त झालेल्या कार्याध्यक्ष आमदार कार्लोस फेरेरा, एम. के. शेख, खजिनदार दत्ता नायक यांनीही आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या.

चोडणकर म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांत राज्यातील भाजप सरकारच्या काळात जनतेने मोठा त्रास सहन केला आहे. या त्रासातून मुक्त करण्यासाठी आगामी निवडणूक काळात राज्यात काँग्रेसचे सरकार येणे आवश्यक आहे. २०२७ मध्ये काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल आणि भाजपचा पराभव करणे हाच जनतेचा कौल असणार आहे. पक्षाचे जयपूर येथे झालेल्या अधिवेशनातील आदेशानुसार १९१ ग्रामपंचायत स्तरावर मंडळ स्थापन केले जाईल आणि पक्ष संघटना मजबूत केली जाईल.

दरम्यान, चोडणकर यांना पुन्हा एकदा ‘जीपीसीसी’ चे अध्यक्ष झाल्याचे पाहून आपणास आनंद झाला आहे. १९९० च्या दशकापासून, जेव्हा ते एक युवा नेते होते, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो, असे आमदार कार्लोस फेरेरा यांनी सांगितले. एम.के. शेख म्हणाले, आगामी काळातील कार्ये समर्थपणे पेलण्यास आपण सक्षम असून पक्षसंघटनेसाठी प्रयत्नशील असणार आहे.

पाटकर नाराज नाहीत : ठाकरे

माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आज अनुपस्थित होते. पाटकर यांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा केली असता माणिकराव ठाकरे म्हणाले की, पाटकर हे नाराज नाहीत. ते सध्या दूरस्थ ठिकाणी असल्याने शपथविधी समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. हा निर्णय पक्षश्रेष्ठींनी (हायकमांडने) घेतला असून सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना काँग्रेससाठी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.

पाटकर नाराज नाहीत : ठाकरे

माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आज अनुपस्थित होते. पाटकर यांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा केली असता माणिकराव ठाकरे म्हणाले की, पाटकर हे नाराज नाहीत. ते सध्या दूरस्थ ठिकाणी असल्याने शपथविधी समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. हा निर्णय पक्षश्रेष्ठींनी (हायकमांडने) घेतला असून सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना काँग्रेससाठी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT