Goa | Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: 'काँग्रेसने 'मामीं'वर केला अन्याय'- प्रमोद सावंत

Goa: समाजकल्याण संघटनेतर्फे गांधी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

Panjim: सांताक्रुझ मतदारसंघाचा विकास होण्यासाठी माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस ऊर्फ मामी यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी रस्त्यावर आंदोलनेही केली मात्र काँग्रेसने त्यांच्यावर नेहमीच अन्याय करत आले. त्यांचे पुत्र आमदार रुदॉल्फ फर्नांडिस यांनी याच कारणासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

या मतदारसंघाचा विकास व्हावा हे त्यांचे अधुरे राहिले स्वप्न त्यांचे पुत्र पूर्ण करतील व त्यासाठी सरकार सर्व ती मदत करील, असे आश्‍वासन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

सांताक्रुझ येथील हायस्कूलमध्ये सांताक्रुझ समाजकल्याण संघटनेतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत्या त्यामध्ये डॉ. सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

व्यासपीठावर आमदार रुदॉल्फ फर्नांडिस व भाजप नेते केशव प्रभू उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

डॉ. सावंत म्हणाले, मामी फर्नांडिस यांनी काही प्रकल्पांची पायाभरणी केली.पण त्यानंतर हे प्रकल्प पूर्णच झाले नाहीत. त्या नेहमीच मतदारसंघाचा व गोव्याचा विकास यासाठी नेहमीच झटत राहिल्या.

मोफत जेवण उपलब्ध: संघटनेतर्फे उपस्थित मुलांना व त्यांच्या पालकांना मोफत जेवण उपलब्ध करण्यात आले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार रुदॉल्फ फर्नांडिस यांच्या हस्ते मुलांना व पालकांना भोजन वाढण्यात आले. आमदार रुदॉल्फ फर्नांडिस हे भाजपवासी झाल्यानंतरचा या मतदारसंघातील पहिलाच कार्यक्रम असल्याने या मतदारसंघातील लोकांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT