Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

Goa Congress Bike Rally: दक्षिण भारतात भाजपला अजूनही लोकांमध्ये स्थान नाही हे केरळ आणि तमिळनाडू येथील विधानसभा निवडणूक निकालांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: दक्षिण भारतात भाजपला अजूनही लोकांमध्ये स्थान नाही हे केरळ आणि तमिळनाडू येथील विधानसभा निवडणूक निकालांनी स्पष्ट केले आहे. यावेळी केरळमध्ये जे घडले ते पुढील वर्षी गोव्यात घडणार आहे. २०२७ मध्ये गोव्यात काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार अशी खात्री काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केली.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीने आज केरळमध्ये स्थापन झालेले काँग्रेस सरकार आणि तमिळनाडूमधील भाजप विरोधी विजय साजरा करण्यासाठी दक्षिण गोव्यात बाईक रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन वीरियातो फर्नांडिस, युवा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अर्चित नाईक, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष आसीस नोरोन्हा, कुशावती जिल्हा अध्यक्ष राजेश वेरेकर हे सामील झाले होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा जल्लोष पाहून आता काँग्रेस कार्यकर्ते गोव्यातही परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज झाले आहेत याचे संकेत आता मिळू लागले आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार कॅप्टन फर्नांडिस यांनी व्यक्त केली. ही रॅली फातोर्डा येथील काँग्रेस जिल्हा कार्यालयाकडून सुरू झाली. त्यानंतर मडगाव आणि नावेली मतदारसंघातून ती फिरली. या रॅलीत काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सामील झाले होते. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जमून जोरदार घोषणाबाजी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

Indian Super League: चेन्नईयीनचा विजय एफसी गोव्याने हिरावला; फातोर्ड्यात सामना 1-1 गोलबरोबरीत

Marathi Language: मराठीच्या नावाने गर्दी नको, गुणवत्तेची लाट हवी! भाषा टिकवण्यासाठी पाच धोरणात्मक बदलांची गरज

Wisdom of the Fourth Tree: तीन झाडांचा अहंकार मोडला, चौथं झाड मात्र आनंदात जगलं; आयुष्याचा मोठा धडा शिकवणारी गोष्ट!

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

SCROLL FOR NEXT