गेले काही दिवस राज्यात काँग्रेसला खिंडार पडणार असल्याची चर्चा होती, यातच गोवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी पक्षातील घडामोडींवरील आपली नाराजी स्पष्ट केली होती. त्यामूळे कामत यांच्याभोवती कायम संशयाची सुई फिरत राहीली. आता खरंच काँग्रेसला मोठे भगदाड पडले असून तब्बल 8 आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
(Goa Congress all committee group will be re-established soon)
यावर काँग्रेस नेते युरी आलेमाव यांनी आपण आणीबाणीला कसं हाताळावं लागत यांचे प्रशिक्षण घेतलं आहे. त्यामूळे आम्ही काँग्रेससाठी समर्थ आहोत. अशा आशयाचे व्यक्तव्य केले होते. काँग्रेसने सावरत आणखी एक पाऊल टाकले असून गोवा काँग्रेस पक्षाच्या सर्व गट समित्या बरखास्त केल्या असून लवकरच सर्व समित्या पुन्हा स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे.
गोवा काँग्रेसने या आशयाचं एक परिपत्रक काढले असून राज्यातील सध्यस्थिती अन् जनमाणसांचा विचार करुन काँग्रेस पुढील निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.
या आमदारांनी ठोकाला काँग्रेस रामराम
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि पक्षाचे इतर नेते यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.या 8 आमदारांमध्ये मायकेल लोबो, दिगंबर कामत, अलेक्सो सिक्वेरा, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर, दिलायला लोबो यांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.