Nilkanth Halarnkar|Sunil Kawthankar  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: खासगी संस्थांकडून होणाऱ्या फायद्यांबाबत 'श्वेतपत्रिका' काढणार का? गोवा काँग्रेसचा नवीन घोटाळ्याचा आरोप

Sunil Kawthankar: बेकायदेशीर मेगा प्रकल्पांना परवानगी दिल्याप्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, असे निवेदन काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी राज्यपालांना पाठविले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मेसर्स वर्ल्ड पीस युनिवर्सिटीला थिवी येथे सर्वे क्रमांक ८८/१(पार्ट) मध्ये दोन लाख चौरस मीटर जागा देण्यापूर्वी गोव्यात स्थापन झालेल्या खासगी शैक्षणिक संस्थांकडून गोमंतकीयांना होणाऱ्या फायद्यांबाबत राज्य सरकार श्वेतपत्रिका काढणार आहे का, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, स्थानिक आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी या प्रकल्पाची माहिती नसल्याचे केलेले वक्तव्य धक्कादायक आहे.

थिवी पंचायतीने गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) मंजूर केलेल्या प्रकल्पासाठी कोमुनिदादची जमीन वाटप करण्याबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना नोंदवण्याबाबत जाहीर नोटिस जारी केली आहे. त्यावर पणजीकर यांनी भाजप सरकार आणखी एक जमीन घोटाळा घडवण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला आहे.

थिवी ग्रामपंचायतीने जनतेच्या माहितीसाठी सूचित केले आहे की, मे. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि शैक्षणिक संशोधन अकादमीच्या एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सतर्फे अभियांत्रिकी, सागरी अभियांत्रिकी, वैद्यकीय विज्ञान, व्यवस्थापन अभ्यास, कला, पत्रकारिता, सार्वजनिक धोरण इत्यादी विषयांवर विस्तृत अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे राज्य खासगी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आयपीबीकडून तत्वतः मंजुरी मिळविल्याचा आरोप पणजीकर यांनी केला आहे.

गोवा-आयपीबीने मेसर्स वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीला थिवी येथील कोमुनिदादची दोन लाख चौ. मीटर जमीन देऊन तेथे खासगी विद्यापीठ स्थापन करण्याच्या उद्देशाने ती जमीन गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आल्याचे पणजीकर यांनी म्हटले आहे.

राज्यपालांनी हस्तक्षेप करावा!

आयपीबी कायद्याचे संपूर्ण उल्लंघन करून आयपीबीने सीआरझेड आणि नो डेव्हलपमेंट झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर डोंगर कापणी झाली असून, रेईशमागूस येथील बेकायदेशीर मेगा प्रकल्पांना परवानगी दिल्याच्या प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, असे निवेदन काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी राज्यपालांना पाठविले आहे.

प्रकल्प कायदेशीरच!

थिवी येथे प्रस्तावित वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी प्रकल्प पूर्णपणे कायदेशीर आहे. आपण काँग्रेस आमदार असतानाच ग्रामसभेत या जमिनीविषयी एज्युकेशनल झोन म्हणून ठराव मंजूर झाला आहे. या प्रकल्पास आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT