विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर ‘म्हारगायचों जागोर’ अभियान सुरू झाले आहे. सरकारविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आज पणजी शहरात व्यापारी, ग्राहकांशी संवाद साधला आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने लादलेल्या महागाईची जनजागृती लोकांमध्ये करण्यात येत आहे. हे अभियान आठवडाभर विविध मतदारसंघामध्ये एकाचवेळी सुरू राहणार आहे व लोकांचे महागाईकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे. (Goa Congress aggressive against inflation)
पणजीतील आझाद मैदानावर या अभियानाची सुरुवात काँग्रेसच्या माजी मंत्री संगीता परब यांच्या उपस्थितीत सुरू होऊन त्यानंतर शहरात फिरून पणजी मार्केटमध्ये ही जनजागृती करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे नेते व माजी महापौर उदय मडकईकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात वाढलेल्या महागाईसंदर्भातची माहिती देणारी पत्रके लोकांना वाटण्यात आली. भाजप सरकारने सामान्य लोकांचे व गरीबांचे ही महागाई वाढवून कसे कंबरडे मोडले आहे याची माहिती दिली. काँग्रेस सरकारच्या काळात व विद्यमान सरकारच्या काळातील महागाईची तुलना करून लोकांना आगामी निवडणुकीत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन यावेळी जनजागृती अभियानातून करण्यात येत होती. यावेळी काँग्रेस नेत्या संगीता परब यांनी पणजी मार्केटातील महिलांना वाढलेल्या महागाईचा विचार करून आगामी निवडणुकीत मतदान करताना योग्य निर्णय घ्यावा. काँग्रेसने नेहमीच गरीबांचा व सामान्य लोकांचा विचार केल्यानेच महागाई नियंत्रणात ठेवली होती, अशी माहिती त्यांनी महिला व्यापाऱ्यांना पत्रके वाटताना दिली.
‘म्हारगायेचों जागोर’ अभियानामार्फत पणजी शहरात काँग्रेसतर्फे पुढील काही दिवस लोकांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांना महामागाईमुळे जो फटका बसला आहे त्याची जाणीव करून देऊन निवडणुकीत भाजपला पुन्हा संधी न देण्याची विनंती या मोहिमेतून करण्यात येत असल्याचे विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी सांगितले. सरकारने राज्यात इंधन दरात कपात केली असली तरी ती निवडणुकीपुरती आहे. भाजप लोकांना भुलवत असून, लोकांनी भुलू नये, असे आवाहन पत्रकांचे वाटप करताना श्री. मडकईकर यांनी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.