Goa Land Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Land Issue: कोमुनिदाद जमिनीवर दोड्डामणींचे नाव; सांत आंद्रेत संताप, वीरेश बोरकर लक्ष्यावर!

Azoshi Mandur Land Controversy: उपजिल्‍हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील पुढील सुनावणी १ डिसेंबर रोजी घेण्‍याचे निश्‍चित केले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सांत आंद्रे मतदारसंघातील आजोशी-मंडूर येथील कोमुनिदाद जमिनीवर परप्रांतीय सादिक दोड्डामणी याचे नाव कूळ म्‍हणून लागल्‍याने आक्रमक झालेल्‍या स्‍थानिकांनी मंगळवारी उपजिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या न्‍यायालयात झालेल्‍या सुनावणीस हजेरी लावली आणि हस्‍तक्षेप याचिकाही सादर केली.

उपजिल्‍हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील पुढील सुनावणी १ डिसेंबर रोजी घेण्‍याचे निश्‍चित केले आहे, अशी माहिती समाज कार्यकर्ते प्रा. रामराव वाघ यांनी पत्रकारांना दिली. यावेळी माजी आमदार फ्रान्‍सिस सिल्‍वेरा यांच्‍यासह आरजी कार्यकर्ते व स्‍थानिक मोठ्या संख्‍येने जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर उपस्‍थित होते. ‘‘सांत आंद्रेतील कोमुनिदाद समितीची पुनर्स्थापना झाली नसल्‍याने सरकारने तेथे ‘कस्‍टोडियन’ची नेमणूक केली आहे.

तिसवाडीचे संयुक्त मामलेदार हे ‘कस्‍टोडियन’ आहेत. परंतु, या नेमणुकीनंतर कोमुनिदाद जमिनीच्‍या कुळांच्‍या यादीत सादिक दोड्डामणी याचे नाव आले. यासंदर्भात उपजिल्‍हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्‍यानंतर ५ रोजी सुनावणी घेतली होती, असे वाघ म्‍हणाले. ‘याप्रकरणी मी दक्षता खात्‍याकडे तक्रार केली आहे. उपजिल्‍हाधिकाऱ्यांनी १ डिसेंबरला पुढील सुनावणी घेण्‍याचे निश्‍चित केले आहे’, असे वाघ म्हणाले.

वीरेशला सरकारची साथ : मनोज

गोमंतकीयांना घरे बांधण्‍यासाठी कोमु‌निदादची जमीन मिळावी, अशी आमची मागणी होती. ती मागणी पूर्ण करण्यासाठीच सांत आंद्रेतील जनतेने वीरेश बोरकर यांना आमदार केले. परंतु, बोरकर यांनी सरकारच्‍या सहकार्याने कोमुनिदादची जमीन दोड्डामणीला देण्‍याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत. जनतेसमोर बोरकर यांना उघडे पाडू, असे मनोज परब म्‍हणाले.

देवस्‍थान, स्‍थानिकांना जमीन देऊन : सिल्‍वेरा

आजोशी-मंडूर येथील जमीन सरकार दोड्डामणी याच्याकडून काढून घेईल, याचा मला पूर्ण विश्‍‍वास आहे. त्यापैकी पाच हजार चौरस मीटर जमीन नवदुर्गा देवस्थानला देण्यासाठी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांकडे मी प्रयत्न करणार आहे, ‍असे फ्रान्सिस सिल्वेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: वडापाव खाऊन घरी परतताना काळाचा घाला; साकोर्ड्यात दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू

Goa Politics: गोव्यात काँग्रेसचा युतीसाठी वेग वाढला; फॉरवर्ड आणि 'आरजी'शी चर्चा करून प्रचार सुरू करण्याचे निर्देश

Vaibhav Sooryavanshi Double Century: 28 षटकार, 53 चेंडू अन् 204 धावा! 15 वर्षीय 'वैभव'चा ऐतिहासिक धमाका, झळकावले सर्वात वेगवान द्विशतक; वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय

Surya Gochar 2026: वर्ष संपण्यापूर्वी 'या' 5 राशींची चांदी! सूर्य गोचरने बदलणार दिवस; होणार मोठा धनलाभ

Goa Politics: पर्रीकरांचा करिष्मा नाही, विरोधकांची एकजूटही नाही; गोव्यात भाजपपुढे सत्तेचे आव्हान

SCROLL FOR NEXT