Deputy CM Babu Kavlekar, in Pernem (Goa) Nivrutti Shirodkar / Dainik Gomantak
गोवा

Goa: ऑगस्ट महिन्यातच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

धनगर समाजाच्या समस्या (Problems of Dhangar community) सोडवणार (Goa)

Nivrutti Shirodkar

मोरजी: पेडणे (Pernem) तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे पुरामुळे (Flood) झालेल्या नुकसानाची भरपाई (Indemnity) ही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यत दिली जाईल, शिवाय एकूण बाराही तालुक्यातील धनगर समाजाच्या समस्या सोडवण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Deputy CM Babu Kavlekar) यांनी पेडणे येथे स्थानिक पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.

शेतीची नुकसान भरपाई कधी ?

तालुक्यात आणि पर्यायाने राज्यात शेतकऱ्यांचे (Farmers of Goa) नुकसान झाले त्याना अजून पर्यंत नुकसानी मिळाली नाही ती कधी मिळणार असा प्रश्न केला असता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरपाई दिली जाणार त्यासाठी नुकसानग्रस भागाची संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तालुक्याचा मामलेदार कृषी अधिकारी आदींनी पाहणी करून नुकसानीचा अहवाल पाठवलेला आहे. आता त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल असे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले.

धनगर समाजाच्या समस्या सोडवणार ?

तुये येथे चार धनगर कुटुंबीय (Ghangar Community Houses) मागच्या ९० वर्षापासून या ठिकाणी झोपड्या वजा छोटी घरे उभारून आपले घरसंसार चालवतात. मात्र गोवा मुक्त होवू ६० वर्षे झाली तरीही त्या घरांना आजपर्यंत वीज,पाणी रस्ता याची सोय नाही. मागच्या १५ दिवसापूर्वी मांद्रे कॉंग्रेसचे युवा नेते सचिन परब यांनी चारही घरांना सोलार तर्फे विजेचे दिवे पेटवले आहे. त्याविशई उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर याना छेडले असता, आपल्या कानावर हि माहिती आजपर्यंत आली नाही, या कुटुंबियांच्या काय समस्या आहेत त्या स्थानिक आमदाराला माहित असणार त्यांनी आपल्या कानावर घातले नाही. ज्या काही समस्या असतील तर त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Small houses of Dhangar community in Pernem Goa.

मोपा घरांना गळती

मोठा गाजावाजा करून सरकारने अर्थात विमानतळ प्राधीकारणाने एकूण १४ धनगर कुटुंबियाना प्रत्येकी ८०० चौरस मीटर जागा देवून,१०० मिटरात घर व ५० मिटरात गोठा अशी योजना आखली आणि त्याना कंपनीने निकृष्ट दर्जाची घरे बांधून दिली, या अधिकाधिक घरांना गळती लागत आहे, कॉंक्रीट गळून गेले आहे. त्या नागरिकांनी आवाज उठवला तर त्यांच्यावर कारवाई करण्याची त्याना धमक्या दिल्या जातात, या धनगर समाजाच्या आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्याना न्याय कसा देणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ,स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे चर्चा करून याही समस्या अधिकाधिक सोडवलेल्या आहेत, घरांची दुरुस्ती केली आहे. मागच्या वेळी काही गोठ्यावर कारवाई होणार होती त्यावेळी आपणच हस्तक्षेप केला म्हणून हि कारवाई टळली. या नागरिकांनी वेळोवेळी आमच्याकडे संपर्क साधला आहे, सरकारमार्फत समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT