Colvale Theft Case Dainik Gomantak
गोवा

Colvale Theft Case: मोबाईल फोन चोरीप्रकरणी एकाला अटक, मोबाईलसह स्कूटरही जप्त

कळंगुटमध्ये सुद्धा मोबाईल चोरीची एक घटना घडली

Ganeshprasad Gogate

Colvale Theft Case गोव्यात दिवसेंदिवस चोऱ्यांचे सत्र वाढत असून नुकतीच अशीच एक घटना उघडकीस आलीय. कोलवळे पोलिसांनी रशीद मुल्ला (वय 22, रा. नागोवा-बार्देश ) याला 10 हजार रुपयांच्या मोबाईल फोनची चोरी केल्याप्रकरणी अटक केलीय.

सदर चोरी केलेला फोन पोलिसांनी हस्तगत केला असून रशीद मुल्लाकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली स्कूटरही जप्त केली आहे

शुक्रवारी सकाळी कळंगुटमध्ये सुद्धा मोबाईल चोरीची एक घटना घडली असून तिथल्या एका रेस्टॉरंट कामाला असलेल्या कामगारांच्या खोलीतून 79 हजारांचे एकूण 4 मोबाईल चोरीला गेले होते.

पोलिसांनी ताबडतोब चोरांचा शोध सुरू केला आणि गुन्हेगार रिझवान मुल्ला आणि मौसेरुल्ल मुल्ला (दोघेही, रा. पश्चिम बंगाल) यांना अटक केली. सध्या सर्वत्र गणेश चतुर्थी सणाची धामधूम असून गर्दी, वाहतूक कोंडीचा फायदा घेऊन चोऱ्यांचे प्रमाण वाढले दिसून येतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

SCROLL FOR NEXT