Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: विदेशी महिला कैद्याचा सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला; पोलिसांकडून महिलेवर FIR दाखल

Colvale Jail: या ना त्या कारणाने कारागृहाचे नाव नेहमीच गाजत असते.

Ganeshprasad Gogate

Colvale Jail: कोलवाळ कारागृत या ना त्या कारणाने चर्चेत येत असून कैद्यांमध्ये होणारी हाणामारी, त्यांच्याकडे सापडणाऱ्या आक्षेपार्ह वस्तू यांमुळे कारागृहाचे नाव नेहमीच गाजत असते.

आता येथील महिला कैद्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे. कारागृहाची अधीक्षक गावकर यांनी याप्रकरणी कोलवाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

या संबंधी मिळालेल्या माहिती नुसार युगांडाची रहिवासी महिला मिनामू हाफुसा हिच्याविरोधात म्हापसा न्यायालयात खटला सुरू आहे.

त्यासाठी दिला कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. या विदेशी महिलेने 23 जानेवारी रोजी दुपारी 12. 20 वाजता कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अचानक हल्ला केला.

यावेळी तिथे असलेल्या अस्मा खान, जयश्री चोडणकर आणि आशा वेंगुर्लेकर यांना चावा घेतला आणि शरीरावर सेफ्टी स्टिकने वार करत त्यांना जखमी केले.

या हल्ल्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी सोबती विदेशी महिलेविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

SCROLL FOR NEXT